Home मराठवाडा मायलेकीच्या खुनप्रकरणात पती, सवत आणि सवतीचा मुलाविरुद्ध गुन्हा दाखल…!

मायलेकीच्या खुनप्रकरणात पती, सवत आणि सवतीचा मुलाविरुद्ध गुन्हा दाखल…!

364

 

चारित्र्यावर संशय घेऊन खून केल्याची मयत महिलेच्या बहिणीची फिर्याद

जालना-लक्ष्मण बिलोरे

सोनलनगर भागातील भारती गणेश उर्फ संजू सातारे (वय ३६) आणि तिची मुलगी वर्षा सातारे (वय १७) या दोघी मायलेकीचा निर्घृण खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
याप्रकरणी मयत भारती सातारे यांची बहीण पंचशीला पांडुरंग कदम यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयत भारती सातारे आणि मुलगी वर्षा सातारे यांना चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती गणेश उर्फ संजू सातारे, सवत सीमा सातारे, सवतीचा१६ वर्षाचा मुलगा या तीन जणांनी बेदम मारहाण केली होती.
गेल्या १५ दिवसापासून आणि काल रात्रभर सुरू असलेल्या या मारहाणीतच त्या दोघी मायलेकीचा मृत्यू झाला.
मयत भारती ही गणेश सातारे याची दुसरी पत्नी होती, तिचे पूर्वी लग्न झालेले होते. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली झालेल्या असून, एकीचे लग्न झालेले आहे, तर दुसरी मुलगी मयत वर्षा ही होती.
मयत भारती यांचे गणेश सातारे याच्यासोबत लग्नापूर्वीपासूनच प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने त्यांच्यापासून पहिल्या पतीने १५ वर्षांपूर्वीच काडीमोड घेतला होता._
त्यानंतर गणेश सातारे याने भारती यांच्यासोबत त्यांची दुसरी मुलगी वर्षा हिच्यासह स्वीकार करून दुसरे लग्न केले होते, हे लग्न आंतरजातीय होते.
मयत भारती यांना गणेश सातारे याच्यापासून झालेला एक मुलगा असून, तो ८ वर्षाचा आहे. याप्रकरणी आरोपी गणेश उर्फ संजू सातारे, त्याची पहिली पत्नी सीमा सातारे आणि १६ वर्षाचा मुलगा ,आशा तीन जणांविरुद्ध भादंवि. ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करून, त्यांना ताब्यात घेतले आहे. मयत मायलेकीवर रामतीर्थ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.