विरेंद्र पाटील यांनी सर्वात कमी वयात मिळवला बहुमान
सुशांत आगे – पुणे
मानव संसाधन विभाग येथे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचा मुलगा विरेंद्र पाटील यांनी रविवारी (दि. १५) लोणावळा टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ५० किलोमीटर अंतर धावण्याची स्पर्धा ६ तास २१ मिनटांत पूर्ण करून सर्वात कमी वयात ही स्पर्धा पूर्ण करण्याचा बहुमान विरेंद्र संतोष पाटील यांनी मिळवला आहे.विरेंद्र पाटील यांनी ही अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा २१व्या वर्षी पूर्ण केली आहे. लोणावळा अल्ट्रा मॅरेथॉन ही लेह लदाख मॅरेथॉन नंतर सर्वात अवघड मॅरेथॉन स्पर्धात गणली जाते. ही टाटा अल्ट्रा मॅरेथॉन लोणावळा अॅम्बी व्हॅली पाँड रस्ता या सह्याद्रीच्या डोंगरद यातील भागात टाटातर्फे आयोजित केली होती. या स्पर्धेत विरेंद्र पाटील यांनी पहिल्या २५ किलोमीटरचे अंतर २.२८ मि नीटांत पार केले. परंतू, नंतर गुडघा दुखावल्यामुळे त्यांचा वेग मंदावला. परंतू, त्याने हार न मानता ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यांनी मागील वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर ३८०० कि.मी. ची व्हर्च्यूयल मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. विरेंद्र हा बी. टेकच्या तृतीय वर्षाचे व्ही.आय. टी. कॉलेज पुणे येथे शिक्षण घेत आहे.