Home जळगाव मेडीकल संचालक निलेश महाजन यांनी थेट औषधी पोहचविली थेट रुग्णांस रेल्वेत हिच...

मेडीकल संचालक निलेश महाजन यांनी थेट औषधी पोहचविली थेट रुग्णांस रेल्वेत हिच उत्तम सेवा

184

*

आधुनिक नेट पद्धतीने मुळे रुग्ण नातेवाईक व मेडीकल संचालक यांचा संपर्क
रावेर (शेख शरीफ)

रावेर येथील साई श्रद्धा मेडिकल ने पुरुवली औषध सेवा
उत्तर प्रदेशातील इलाहबाद येथील रुक्सार बी वय वर्ष 20 ही मुलगी रात्री कामायनी एक्सप्रेस ने रात्री एकटी प्रवास करत होती तिला ताप आणि खोकला यांचा त्रास होत होता त्यामुळे पुढच्या प्रवासात काही त्रास वाढू नये म्हणुन तिने सर्तकता व जागरुक पणे लागलीच आपल्या मामांना इलाहाबाद येथील एडवोकेट जावेद खान यांना मोबाईल व्दारे संपर्क केला भुसावल वरून कामायनी एक्सप्रेस ही रावेर कडे निघाली होती लगेच एडवोकेट जावेद खान यांनी त्यांच्या डॉक्टरांना संपर्क केला डॉक्टरांनी काही मेडिसिन लिहून दिल्या व ह्या औषध लगेच घ्यावे असे सांगीतले नमके औषधे रेल्वेच्या डब्यात कश्यापोहचविल्या जातील यासाठी लगेच जावेद खान यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत गूगल वरती सर्च करून जवळील गाव मेडिकल स्टोअर्स कोणते उपलब्ध होतील ते सर्च केले असता निलेश महाजन यांचे साई श्रद्धा मेडिकल रावेर हे दिसून आले लागलीच त्यांनी मेडिकल चे संचालक निलेश महाजन यांच्याशी संपर्क केला एडवोकेट जावेद खान यांनी पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शन (औषधी ) निलेश महाजन यांनी स्वतः लगेच घेऊन रावेर रेल्वे स्थानक गाठले व व त्या डब्यामध्ये जाऊन त्या मुलीला शोधुन औषध कसे घ्यायचे हा डोस समजावून सांगीतले

औषधी दिल्या नंतर त्यांचे अँड जावेद खान यांन आभार व्यक्त केले थोडया वेळानी जेव्हा ताप नॉर्मल झाला त्यांनी पुन्हा एकदा कॉल करून निलेश महाजन यांचे आभार मानले.
————————————
अशी अनोखी रुग्ण सेवा रावेर येथील माऊली हॉस्पीटल संचालक डॉ. संदीप पाटील व त्यांच्या पत्नी स्त्रीरोग तज्ञ व डॉ. योगिता पाटील बालरोग तज्ञ यांनी मागील महीन्यात खाजगी कामासाठी जात असताना रात्री आठ वाजेच्या दरमया खानापुर जवळ अनोळखी व्यक्तीस पडलेल्या अवस्थेत असतांना आपल्या गाडीतील औषधी किट्स वापर करून प्रथमोचार करीत रस्त्याच्या कडेला सलाईन देवुन करून प्राण वाचविले होते त्यांची दखल स्वतः पुलिस अधिक्षक श्री प्रविण मुंढे सर यांनी दखल घेत रावेर पोलीस स्टेशन , आय एम ए रावेर, निमा शाखा रावेर, होमोपॅथीक डॉक्टर संघटना रावेर ‘ रावेर तालुका केमीस्ट असोशियन संयुक्त विद्यमाने रावेर तालुक्यातील डॉक्टर्स यांना औषधी किट्स दिल्या तसेच असा पॅटन जिल्हाभर राबवु अशी घोषणा केली आहे.