Home यवतमाळ पारवा पोलीस स्टेशन व जनता यांचे संबंध वृद्धिंगत होण्यासाठी पारधी बेड्यावर बैठक..!

पारवा पोलीस स्टेशन व जनता यांचे संबंध वृद्धिंगत होण्यासाठी पारधी बेड्यावर बैठक..!

103

 

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी : पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस व जनता यांचे संबंध वृद्धिंगत होण्यासाठी पारवा येथील पारधी समाजाच्या बेड्यावर जाउन प्रभारी ठाणेदार तथा सावळी (सदोबा) दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, साहित्यिक प्रा. नामदेव भोसले आदींनी जाउन पारधी समाजातील स्री पुरुषांच्या अडी अडचणी जाणुन घेतल्या.
तसेच तरुन मुले, मुली यांना शिक्षणाच्या व आरक्षणाच्या माध्यमातून तरुणांनी पोलीस भरती, विविध सरकारी नोकरी व स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत कसे जाता येईल या बाबतची सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांनी या वेळी दिली. साहित्यिक प्रा. नामदेव भोसले यांनी शासकीय योजनांची माहिती दिली.
या वेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. नामदेव भोसले, प्रभारी ठाणेदार तथा सावळी सदोबा दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस अंमलदार निर्मल राठोड, तलाठी पेंदोर या सह पारधी समाजातील स्री पुरुष उपस्थित होते.