Home मराठवाडा आमदार राजेश टोपे यांच्या साखर कारखान्यांची चोकशी करा’ – डॉ. हिकमत उढाण

आमदार राजेश टोपे यांच्या साखर कारखान्यांची चोकशी करा’ – डॉ. हिकमत उढाण

695

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील समर्थ आणि सागर सहकारी साखर कारखान्याच्या ढिसाळ ,नियोजनशून्य कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे.यास घनसावंगीचे आमदार तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे जबाबदार आहेत.राजेश टोपे यांच्या साखर कारखान्याच्या गैरव्यवहाराची चोकशी करा अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना नेते डॉ. हिकमत उढाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. मंत्री राजेश टोपे यांनी गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर घनसावंगी आणि अंबड च्या कार्यक्षेत्राबाहेरील गेटकीनचा ऊस मोठया प्रमाणावर आणला . साखर कारखान्याची क्षमता नसतानाही राजकिय हेतूने भरमसाठ नोंदी घेण्यात आल्या आहेत.ऊसाची हमी घेतली असल्याच्या कारणाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली .कार्यक्षेत्राबाहेरील साखर कारखान्याना ऊस देवू, ऊसाचे टिपरूही शिल्लक राहू देणार नाही. असे खोटे आश्वासन राजेश टोपे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले.त्यामुके अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे .असे निवेदनात उढाण यांनी म्हटले आहे.मंत्री राजेश टोपे यांच्य कारखान्यानी .हजारो शेतकऱ्यांकडून १० हजार शंभर रूपये गोळा केले . ही रक्कम कशासाठी घेण्यात आली .हा संभ्रम आहे . हे पैसे सभासत्वासाठी की विना परतीची ठेव की लाभार्थी सभासद म्हणून‌ घेतले ? अशा प्रकारे करोडो रूपये जमा केले.हा मोठा आर्थिक घोटाळा आहे.पैसे गोळा करताना ऊस घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते.शेतकऱ्यांनी पैसे देवूनही ऊस नेण्यात आला नाही असेही डॉ. हिकमत .यानी निवेदनात म्हटले आहे.