जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी ची मागणी
रावेर (शेख शरीफ)
काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या निरपराध सर्वसामान्य नागरिकांचीकाश्मीर खोऱ्यातील हल्याचा त्रिव निषेध – सरकारने निरपराध लोकांची होणारी हत्या त्वरित थांबवावी* व त्यात खास करून काश्मिरी पंडित व इतर धर्मीय लोकांना तसेच सुरक्षा रक्षकांवर हल्ले करून मारण्यात येत आहे अशा या काश्मीर खोऱ्यातील हल्याचा जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी ने त्रीव निषेध केला आहे.
काश्मीर खोऱ्यातील या निरपराध नागरिकांना शासनाने त्वरित सुरक्षा प्रदान करावी तसेच त्या ठिकाणी होत असलेल्या अतिरेकी कारवायांवर पायबंद घालावा सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या ठिकाणी व संपूर्ण भारतात दोन समाजात जे तेढ निर्माण करीत आहेत त्या समाजकंटकां विरुद्ध व माध्यमा विरुद्ध शासनाने त्वरित योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली.
*जुमा नमाज़ नंतर प्रार्थना*
काश्मीर खोऱ्यात मरण पावलेल्या मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या दुःखात मन्यार बिरादरी सामील असून काश्मीर मधील रहिवासियासाठी विशेष प्राथना करण्यात आली.
*पंतप्रधान व गृह मंत्र्यांना निवेदन*
जिल्हाधिकारी यांच्या विशेष प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी महसूल श्रीमती शुभांगी भारदे यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी व गृहमंत्री माननीय अमित शहा यांना निवेदन देण्यात आले व त्यात वरील चार मागण्या करण्यात आल्या.
*निवेदन देताना यांची होती उपस्थिति*
जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी च्या वतीने श्रीमती नसरुन फातेमा यांनी श्रीमती भारदे यांना निवेदन दिले त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, जळगाव शहर महानगर अध्यक्ष सय्यद चाँद सय्यद अमीर, मन्यार युवा बिरादरीचे अल्ताफ शेख व अख्तर शेख जिल्हा बिरदारीचे वरिष्ठ पदाधिकारी सलीम शेख मोहम्मद, हारून शेख मेहबूब, अब्दुल रउफ़ अब्दुल रहीम, यासह शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान यांची विशेष उपस्थिती होती.
*निवेदन सादर करतांना ची मागणी*
यावेळी निवेदन देताना फारुक शेख यांनी काश्मीर खोऱ्यातिल या करवाइस कोण जवाबदार आहे? त्याच्यावर कारवाई करण्यात सरकार का कमी पडत आहे? याचा सकारात्मक विचार करून ज्या संघटना, ज्या व्यक्ती, अथवा जे माध्यम दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना करीत आहेत त्यांच्यामुळे असे प्रकार घडत असल्याने अशा संघटनांवर, माध्यमांवर सरकारने त्वरित कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे.
फोटो कॅप्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना मागण्याचे निवेदन देताना श्रीमती नसरून फातेमा सोबत फारुक शेख, सय्यद चाँद, हारून शेख, सलीम मोहम्मद, अब्दुल रउफ, अख्तर शेख, अल्ताफ शेख मुजाहिद खान आदी दिसत आहे.