मा.पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) तर्फे निवेदन.
दारव्हा (प्रतिनिधी):-राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती ( NATIONAL ATROCITY PREVENTION FORCE) अर्थात नफ ही राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी एक
सामाजिक संघटना असुन मुलनिवासी बहुजन समाजातील अन्यायग्रस्त लोकांना सामाजिक न्याय देण्याचे काम करत आहे.
मा. कैलाश यादवराव राऊत मु. पोस्ट तुपटाकळी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ, यांनी दिनांक २८/३/२०२२ रोजी नफ संघटनेला दिलेल्या लेखी अर्जानुसार, मा.कैलाश यादवराव राऊत यांची १८ वर्षाची मुलगी निकिता कैलाश राऊत ही जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रूग्णालया अंतर्गत परिचारिका A N M प्रशिक्षण घेत होती. प्रशिक्षण घेत असताना निकिता राऊत ही मुलगी रूग्णालयाच्या हॅास्टेल मध्ये रहात होती. परंतु दिनांक ०५/२/२०२२ रोजी निकिता कैलाश राऊत या मुलीचा अचानक मृत्यू झालेला आहे. निकिताचा मृत्यू झाला त्यावेळी तिच्या आई वडलांना याबद्दल त्वरित कळवले नाही. निकिता एक महिन्या पूर्वी तिच्या आई वडीलांच्या घरी होती त्यावेळी तिला कोणताही आजार नव्हता. हॅास्टेल साठी घरातुन निघताना निकिताची प्रकृती अतिशय उत्तम होती. तसेच दिनांक ०५/२/२०२२ रोजी तिचा मृत्यू झाला त्या दिवशीच्या आदल्या रात्री १२ वाजे पर्यत निकिता ही तिच्या मैत्रीण सोबत अभ्यास करत होती. त्यामुळे जर निकीताचा मृ्त्यु हा तिच्या आजारपणा मुळे झाला तर मग ती आजारी असल्याचे तिच्या पालकांना हॅास्टेल प्रशासनाने का कळविले नाही? या सर्व गोष्टीचा निकिताचे वडील मा. कैलाश यादवराव राऊत यांना संशय येत आहे. निकिता ही गरीब कुटुंबातील मुलगी असुन अनुसूचीत जाती या प्रवर्गातील होती. निकिता ही अभ्यासात फारच हुशार होती. इयत्ता १२ वी मध्ये निकिताला ८६ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे आपल्या हुशार मुलीच्या अचानक मृत्यू मुळे तिचे आईवडील अजूनही दु:खात आहे. म्हणून निकिताच्या आईवडीलांची अशी मागणी आहे की त्यांच्या मुलीच्या मृत्यूचे नेमके खरे कारण काय आहे?
त्यामुळे निकिता कैलाश राऊत या १८ वर्षिय मुलीचा मृत्यू संशयास्पद झालेला आहे. म्हणुन निकिताच्या मृत्युची सखोल चाैकशी आपण करावी अशा आशयाचे निवेदन रविंद्र येळींजे
नफ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या सहिनिशी बिमोद मुधाने
नफ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, यांच्या नेतृत्वात जयपाल सोनोने, करण खंडारे, कैलाश यादवराव राऊत,(निकिताचे वडील), सुलोचना कैलाश राऊत (निकिताची आई), अनुजा कैलाश राऊत (निकीताची लहान बहीण) यांच्या उपस्थितीत मा.दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक यवतमाळ यांची प्रत्येक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.