वाशिम:-मंगरुळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील बीएसएनएल कार्यालयासमोर एका घरामध्ये महिलेचे शव आढळल्यामुळे एकच खळबळ ऊडाली असुन पोलीसांना माहीती मिळताच घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.
सविस्तर वृत्त असे की,दिनांक १४ जुनच्या सकाळी दहाच्या सुमारास मंगरुळपीर शहरातील मंगलधाम परिसरात असलेल्या बिएसएनएल कार्यालयासमोरच्या एका घरात महिलेचा मृतदेह आढळला असल्याची माहीती पोलीस विभागाला प्राप्त झाली.माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला.मृतक महिलेचे नाव संजना रामचंद्र बोंते वय ५७ असल्याचे कळले असुन त्या घरी एकट्याच राहत होत्या असे कळले. संत गाडगेबाबा बचाव पथकाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सदर महिलेचा मृतदेह ऊत्तरीय तपासणीसाठी पाठवला.पुढील तपास एसडिपिओ आणी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.त्या महिलेचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळु शकले नाही.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206