Home वाशिम महावितरणचे अधिकारी नाचतात ठेकेदाराच्या तालावर

महावितरणचे अधिकारी नाचतात ठेकेदाराच्या तालावर

165

 

विज ग्राहकांना सोडतात माञ वार्‍यावर

फुलचंद भगत
वाशीम :- मालेगाव तालुक्यात झालेल्या पहिल्याच पावसात महावितरण चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे .शनिवारी दुपारी झालेल्या हवापाण्यामध्ये 33 केव्ही विज पुरवठा करणारे 6 पोल तर किन्हीराजा अंतर्गत कवरदरी फिडर विज पुरवठा होत असलेले 6 पोल असे एकूण 12 पोल पडल्यामुळे किन्हीराजा 33\11 केव्ही उपकेंद्र ला होणारा विज पुरवठा पूर्णतः खंडित झाला होता.विज पुरवठा चालू होण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे पर्यायी विज पुरवठा म्हणून किन्हीराजा 33/ 11 केव्ही उपकेंद्रा साठी कार्ली 33/ 11 केव्ही उपकेंद्रा वरून विज पुरवठा करण्यात आला होता तर कवरदरी फिडरसाठी ज उ ल का 33/ 11 केव्ही उपकेंद्रा वरून विज पुरवठा करित पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. अत्यावश्यक असलेल्या खंडित विज पुरवठ्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले आहे त्याने मात्र हम करे सो कायदा प्रमाणे काम करित 33 केव्ही चे 6 पोल उभे करण्यासाठी तब्बल 3 दिवस लावले तर किन्हीराजा 11 के व्ही वरून कवरदरी फिडरला विज पुरवठा करणारे 6 पोल साठी आज 7 वा दिवस उजाडाला असूनही शेतकऱ्याच्या शेतात आज ही पोल जसेचा तसेच् पडलेले आहे त्यामुळे शेतकरी यांना आपल्या शेतात काम करताना अडचणी चा सामना करण्याची वेळ आली आहे महावितरण अधिकारी यांचे ठेकेदारावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसुन येते.तर ठेकेदार मात्र कामाचा मोबदला घेऊनही वेळ असेल तेव्हा स्वतःचे सर्व कामे करून आपल्या शिवाय महावितरण ला पर्यायच् नाही या भ्रमात वावरत आहे आणी आपल्या तालावर महावितरण अधिकारी यांना नाचवत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. तरी त्वरित पर्यायी ठेकेदार यांच्या कडून पोल चे काम करण्यात यावे तसेच् महावितरण कर्मचारी यांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे तसेंच शेतकरी यांनाही आपली शेतीची कामे करण्यासाठी होत असलेली अडचण त्वरित दूर कर ण्या ची मागणी होत आहे.