फुलचंद भगत
वाशिम:-मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) हे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी व गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणेकरिता विविध उपक्रम राबवीत असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांविरोधात मोहीम हाती घेतली असून त्याबाबत सर्व पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना प्रभावीपणे मोहीम राबविण्यास आदेशित करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री.एस.एम.जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी त्यांचे शाखेतून वेगवेगळे पथक
तयार करून कारवाईकामी रवाना केले व वाशिम शहरातील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथील विष्णू प्रिंटर्स या दुकानातून एक लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्या संबंधाने पोलीस स्टेशन शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच रिसोड तालुक्यातील ग्राम चिखली येथे एका व्यक्तीचे घरातून दोन लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्यासंबंधाने पोलीस स्टेशन रिसोड येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावर्षभरातील शस्त्र अधिनियमांन्वये करण्यात आलेली हि नववी (०९) कारवाई आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे यांचे नेतृत्वात श्री. एस. एम. जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकातील सपोनि. प्रमोद इंगळे, सपोनि. विजय जाधव, पोहवा. सुनील पवार, गजानन अवगळं, पोना.राजेश गिरी, अमोल इंगोले, गजानन गोटे, राम नागुलकर, पोकॉ. किशोर खंडारे,निलेश इंगळे, डिगांबर मार, अविनाश वाढे, संतोष शेनकुडे, मपोहवा. सुषमा तोडकर, तेहमिना शेख यांनी केलेली आहे.
वाशिम जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठा बाळगणाऱ्या लोकांवर तत्परतेने कारवाई सुरु असून मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण वाशिम जिल्हा पोलीस दल जनतेच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये दहशत निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरोधात न घाबरता समोर येऊन तक्रार करण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.