रावेर (शेख शरीफ)
रावेर तालुक्यातील येथिल खिज़र उर्दू माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.३१ टक्के लागला आहे.
यावर्षी विद्यालयातुन एकुण ६४ विद्यार्थांनी परीक्षा दिली होती त्यातुन ६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
विद्यालयातुन सर्व प्रथम अलमीज़ा बी शेख़ इरफान आली असुन तीला एकूण ८२.८० टक्के गुण मिळाले, शेख सुफियान शेख लियाकत हा ८२.४० टक्के गुण घेऊन व्दितीय आला व तृतिय शेख ज़कारीया शेख ज़ाकीर आणि बुशरा बी शेख ज़ुबेर यांना ८२.२० टक्के गुण मिळाले.
यशस्वी विद्यार्थांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी सर्व विद्यार्थांचे कौतुक व अभिनदंन खिज़र शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष हयात खान, उपाध्यक्ष असलम खान, चेअरमन हसन मिस्तरी, उपचेअरमन शेख निसार, सचिव शरीफ खान, उपसचिव शेख मुस्तकीम, सदस्य शेख कलीम मेम्बर, शेख गफूर, शेख अबरार, शेख जावेद, शेख हयात, मुख्याध्यापक शेख निसार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.