Home मराठवाडा लुटमार प्रकरणी फिर्यादीच बनला आरोपी…

लुटमार प्रकरणी फिर्यादीच बनला आरोपी…

157

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

पेट्रोलपंप मालकाने पेट्रोल विक्रीचा हिशोब वारंवार विचारल्याने ,व्यवहारातील आर्थिक घोळ जिरवण्यासाठी लुटमार केल्याचा ड्रामा रचला ,लुटमारीचे बनावट प्रकरण पेट्रोल पंपावरील मॅनेजरच्या
अंगलट आले.मॅनेजरने या लुटमारीच्या बनावट घटनेची ठाण्यात फिर्याद दिली, परंतु घनसावंगी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोनिरिक्षक प्रशांत महाजन यांच्या भेदक नजरेतून गुन्हेगार सुटू शकला नाही.एकंरीत परिस्थिती आणि फिर्यादीच्या संशयास्पद हालचाली यावरून पोलिसांनी फिर्यादीच्या मुशक्या आवळल्या ,पोलिसी खाक्या दाखवताच फिर्यादी पोपटासारखा बोलू लागला, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
या संदर्भात घनसावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ मे २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी नईम दगडू सय्यद ,वय ३५ वर्षे यानी मुर्ती फाटा कुंभारपिंपळगाव येथील श्रीकृपा पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोकड ६ लाख ५८ हजार ८४० रूपये बॅकेत भरणा करण्यासाठी दुचाकी वाहनाने जात असतांना चारचाकी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी त्यास रस्त्यात अडवून लुबाडले आणि चोरटे पळून गेले असल्याची तक्रार दिली.नईम सयदच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान,घनसावंगी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. फिर्यादी असलेला या पेट्रोलपंपावरील मॅनेजर नईम सय्यद याच्यावर पोलिसांचा सुरूवातीपासूनच संशय होता.फिर्यादीची देहबोली,आणि एकंदरीत संशयास्पद हालचाल,गुन्ह्याच्या ठिकाणचे मोबाईल डाटाचे तांत्रीक
विश्लेषण केल्यानंतर सदरचा लुटमारीचा प्रसंग हा बनावट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.अधिक चौकशीत पेट्रोलपंपावर मॅनेजर म्हणून काम बघत असलेला नईम सय्यद हा पेट्रोलपंप मालकाला दैनंदीन व्यवहाराचा हिशोब देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजले.पेट्रोलपंपावर पेट्रोल विक्री व्यवहारात केलेला आर्थिक घोळ दडपून टाकण्यासाठी जबरी चोरीचा प्लॅन रचला असल्याची कबुली नईम सय्यदने पोलिसांना दिली.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे,अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख,सुनील पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली घनसावंगी ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या प्रकरणाचा ‌छडा लावला ,पोउनि वाय ए टाकसाळ,पोका एस एच वैद्य,नागलोत,बावीस्कर यांचा समावेश होता.