Home बुलडाणा केंद्रीय सह बँकेकडून पाडळी शिंदे सह ठीक ठिकाणी डिजिटल साक्षारता अभियान संपन्न

केंद्रीय सह बँकेकडून पाडळी शिंदे सह ठीक ठिकाणी डिजिटल साक्षारता अभियान संपन्न

155

 

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:- शाखा देऊळगाव मही यांचे संयुक्त विद्यमाने मेंडगाव ,सावखेड नागरे,व आज ७जुलै रोजी पाडळी शिंदे येथे डिजिटल साक्षरता अभियान राबविण्यात येत असून त्यात बँकेचे कर्ज वाटप ,भरणा ,डिजिटल पेमेंट, सुरक्षा ठेव,तसेच बँकेकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तथा राष्ट्रीय कृत बँकेच्या सोबत ग्राहकांच्या सोईसाठी बँकेकडून दर आठवड्यात एकदा बँकेची गाडी एटीएम मशीन सह गावागावात येणार असून ग्राहकांना सर्वतोपरी सहकार्य मिळाले पाहिजे असे त्यामुळे ग्राहकांना सेवा मिळेल व बँकेकडे जास्तीतजास्त ग्राहक यावे तसेच बँकेकडे सुरक्षा ठेव निःसंकोचपणे ठेवा व आपले खाते आधार लिंक के वाय सी सह सुरळीत चालू ठेवावे ,बँकेची अँप,सुरक्षित व्यवहार, फसवणूक टाळा व आधार बेस पेमेंट व बँकेच्या सर्व डिजिटल सेवा आपल्या हक्काच्या बँकेकडून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष श्रीकृष्ण विष्णू शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रवींद्र बापू शिंदे हे होते यावेळी अविनाश जोशी,मसूद पठाण, पत्रकार स्वप्नील शिंदे यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन व आभार रोखपाल टेकाळे यांनी केले, तर प्रमुख उपस्थिती मध्ये हिम्मतराव शिंदे, मधुकर मिसाळ,दिनकर शिंदे, विजय शिंदे, राजू शेळके,सुरेश शिंदे, संजय शिंदे, सतीश शेळके,पांडुरंग शेळके,रामभाऊ शिंदे, शिवाजी गोरसे,यांच्या सह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी अविनाश जोशी,प्रदीप झोटे बँक मॅनेजर,मसूद पठाण विकास आधिकारी, शिवहरी टेकाळे रोखपाल,प्रमोद आढाव गटसचिव, नारायण शिंगणे शिपाई,आदींनी परिश्रम घेतले,