पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
मुदखेड , दि.३० :- रोजी निवघा ग्रामपंचायत येथे मा. डाक अधीक्षक श्री.शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा डाकपाल निवघा यांनी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृद्धी खाते योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मार्केटिंग एक्सिकेटीव्ह श्री.सुरेश सिंगेवार यांनी म्हणाले की शून्य ते दहा वर्षापर्येंतच्या मुलींच्या आई व वडिलांनी मुलींच्या नावे सुकन्या समृध्दी खाते योजना ही आजच्या काळाची गरज आहे.
प्रत्येक मुलींच्या आई व वडिलाचं स्वप्न असतं की लेकीचे शिक्षण पूर्ण व्हावं तीला डॉक्टर, इंजिनिअर, तहसीलदार, पायलट, जिल्हाधिकारी होऊन जनतेची सेवा करावी अस मुलींच्या आई व वडिलांना वाटत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुकन्या समृध्दी खाते योजनेचा लाभ घ्यावा असे सिंगेवार यांनी आपल्या भाषणात बोलतं होते.
हा कार्यक्रम भारत सरकार भारतीय डाक विभाग नांदेड यांच्या वतीने या मेळाव्याचे ठेवण्यात आला होता.
पुढे बोलताना मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार म्हणाले की या योजनेला सुरुवात होऊन पाच वर्षे झाले पण ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेची माहिती नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर व नागरिकांचे मुली या योजना पासून दूर राहिल्या आहेत.
या करिता मुलींच्या आई व वडिलांनी आपल्या गावात ही योजना आली आहे यांचा लाभ घ्यावा.कारण मुलींचे लग्न जवळ आले की ग्रामीण भागात मुलीचे वडील खाजगी सावकारी कर्ज घेण्यासाठी बळी पडतात किंवा शेती व घरे विकण्याची परिस्थितीत निर्माण होते ही वेळ येऊ नये यासाठी सुकन्या समृध्दी खाते योजनेचा लाभ घ्यावा असे आपल्या भाषणात सिंगेवार यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पोफळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.महाजन किशनराव पोफळे यांनी केले.
या मेळाव्यात महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात मुलीचे खाते उघडण्यासाठी गर्दी केली व जवळपास दोनशे मुलीच्या नावे खाते उघडण्यात आले आहे.