Home यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महागाव तालुक्यातील पूरपरिस्थिती व नुकसानीचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महागाव तालुक्यातील पूरपरिस्थिती व नुकसानीचा आढावा

146

नागरिकांना सतर्कतेचा व प्रशासनाला सहकार्याचे केले आवाहन

यवतमाळ / हरीश कामारकर

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज सकाळी ११वाजता च्या दरम्यान विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवरील धनोडा येथे भेट देवुन पैनगंगेच्या पुराचा आढावा घेत नागरिकांना सतर्क राहुन सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
मागील चार दिवसांपासुन पावसाची संततधार सुरूच असल्याने पाणी पातळी वाढुन नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्याने नदी,नाल्यांना पुर येवुन काठावरील शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.तर काही ठिकणी पुरामुळे संपर्क तुटला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज महागाव व उमरखेड तालुक्यातील पुर परिस्थितीचा व झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी भर पावसात दौऱ्यावर आले असतांना त्यांनी विदर्भ व मराठवाड्याच्या सिमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या धनोडा येथे भेट देवुन परिस्थिती जाणुन घेतली व नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहुन सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.व्येंकट राठोड,महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण,मंडळ अधिकारी एकुलवार,तलाठी सुभाष कुंदर्गे,एम.एम.शेख ,महसुल कर्मचारी जीवन जाधव, यांच्यासह प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते.
###चौकट###
अधर पुस प्रकल्पामधुन सहा दरवाजे ५० सेमी ने उघडुन पाण्याचा विसर्ग .
सततच्या पावसामुळे महागाव तालुक्यातील अधर पुस प्रकल्पामध्ये पाणी साठ्यात वाढ होत असुन मंजुर जलाशय प्रचलन सुची(ROS) नुसार धरणात जलसाठा ठेवायचा असल्याने आज ५०सेमी ने चार दरवाजे उघडले असुन आहेत त्यामुळे एकुण सहा दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग पुसनदीपात्रात होत असल्याने नदी काठावरील नागरिकांनी सुरक्षित व सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप घोलप यांनी केले आहे.