Home बुलडाणा प्रतिपंढरपूरात गोविंदा.. गोविंदाच्या गजरात रंगला महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहिहंडीचा सोहळा

प्रतिपंढरपूरात गोविंदा.. गोविंदाच्या गजरात रंगला महाराष्ट्रातील सर्वात मोठा दहिहंडीचा सोहळा

222

 

पालखी सोहळ्यात”श्री घ्या दर्शनासाठी लोटला जनसागर लेझीम पथकाने जिंकली भाविकांची मने

कैलास राऊत 

मेहकर  – सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव माळी नगरीत आषाढी उत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या आनंदात पार पडला या सोहळ्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठी २००,किलो वजनाची दहीहंडी 14 जूलै रोजी संध्या. ६वाजता लाखो भक्तांच्या उपस्थितीत हा दहीहंडी सोहळा पार पडला डोळ्याची पारणे फेडणारा हा सोहळा पाहून भक्तांची मने आनंदाने भरून गेले व प्रत्येक भक्त गोविंदा गोविंदाचा गजरात दंग झाला होता, संध्याकाळी सहा वाजता सखाराम पाटील मगर व संदीप पाटील यांनी दहीहंडी फोडली तेव्हा गोविंदा गोविंदा च्या गजरात संपूर्ण प्रतिपंढरपूर नगरी दुमदुमून गेली, 15 जुलै रोजी सकाळी ५वा. श्रींची भव्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली या पालखीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या 120 दिंड्यांनी सहभाग घेतला होता, श्रींचे दर्शन घेण्यासाठी देऊळगाव माळी नगरीत शेकडोंचा जनसागर लोटला श्रींच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी जागोजागी रांगोळी काढून श्रींच्या पालखीचे स्वागत केले व गावात ठिकठिकाणी विठ्ठल भक्तांची चहा व फराळाची व्यवस्था अनेक मंडळांच्या वतीने करण्यात आली, अनेक पिढ्यापासून पालखी धरण्याचा मान असलेले बारा बलुतेदार व अठरा आलुतेदार यांच्या सक्रिय सहभागातून हा भव्य दिव्य सोहळा पार पडला संध्याकाळी चार वाजता पालखींचे मंदिरात आगमन झाल्यानंतर श्रींची भव्य आरती घेण्यात आली त्यानंतर महाप्रसादाची वितरण करण्यात आले, (चौकट) लेझीम पथकाने जिंकली भाविकांची मने यावर्षी पालखी सोहळ्यात प्रथमच भव्य मोठ्या प्रमाणात मुलींच्या लेझीम पथकाचे आयोजन करण्यात आले होते या लेझीम पथकाचे आयोजन अलकाताई गिर्हे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले असून या लेझीम पथकात 60 पेक्षा जास्त तरुणींनी सहभाग घेतला होता लेझीम पथकासोबतच लाठीकाठी चे प्रात्यक्षिकही मुलींनी व अनेक मुलांनी या ठिकाणी करून दाखवले त्यावेळी भाविकांनी त्यांना जोरदार टाळ्या वाजवून दाद देत संपूर्ण गावभर लेझीम पथकाची कवायत पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनसागर लोटला होता यामुळे या लेझीम पथकाने भाविकांची मन जिंकून पुढील वर्षी याहीपेक्षा मोठा लेझीम व ढोल पथक तयार करण्यात असल्याचे अलकाताई गिर्हे व या लेझीम पथकाला विशेष सहकार्य करणारे प्रकाश डोंगरे यांनी कळविले आहे. ( चौकट) पत्रकारांच्या वतीने पालखीच्या मानकर्याचा यांचा भव्य सत्कार . स्वराज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीनशे वर्षाची परंपरा असलेल्या या दहीहंडी व पालखी सोहळ्यातील मानकरी यांचा स्वराज्य पत्रकार संघाचे जिल्हा सचिव पत्रकार कैलास राऊत पत्रकार किसन लाठे पत्रकार गजानन सरकटे पत्रकार राजेश मगर पत्रकार रवी सुरूशे अर्जुन चाळगे यांच्यावतीने मानकरी. एकनाथ चाळगे सुभाष चाळगे उद्धव चाळगे ज्ञानेश्वर पोकळे सुनील गाभणे रामेश्वर लोणकर वसंता मोतेकर बबन गाडेकर संदीप मोतेकर कैलास मोतेकर संजय काटोले सुनील भराड संजय राऊत बळीराम भराड शिवाजी तिडके संतोष गोरे गणेश तायडे आसाराम काळे संस्थांचे अध्यक्ष तुकाराम मगर उपाध्यक्ष रघुनाथ भराड अलकाताई गिर्हे , प्रकाश डोंगरे संदीप पाटील सखाराम पाटील शंकर महाराज कुडके ह.भ.प. प्रकाश महाराज मगर अशोक मते राजू गाभणे रामेश्वर भराड नितीन भराड ,उकंडा बळी ,श्री संत सावता भोजन समिती वसंत श्री भोजन समिती इत्यादी सर्वांचा सर्व मानकर यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी पांडुरंग संस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते._