Home सोलापुर पिता – पुत्रावर अँट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध….!!

पिता – पुत्रावर अँट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध….!!

212

🔶अक्कलकोट – सतीश मनगुळे

अक्कलकोट , दि. ३० :- येत्या ४८ तासात जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र अमोलराजे भोसले यांच्यावरील अँट्रॉसिटीचा खोटा गुन्हा मागे न घेतल्यास त्या पिता-पुत्रांना थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात घेऊन येऊ असा इशारा सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक माऊली पवार, सोलापूर यांनी देऊन, असे खोटे गुन्हे व काड्या करणाऱ्याला त्वरित हद्दपार करा अन्यथा रस्त्यावर उतरू असे सांगितले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून सेवा कार्याचा आदर्श निर्माण करणारे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अमोलराजे भोसले यांच्या कार्याविषयी असूया निर्माण झालेल्या समाज कंटकाने जाणीव पूर्वक बदनामीचे कटकारस्थान चालविले आहे.

त्याचाच एक भाग म्हणजे तथाकतीत व स्वताला पत्रकार म्हणून घेणारा स्वामिनाथ यशवंत हरवाळकर हा सोशल मिडियाच्या माध्यमातून द्वेष बुद्धीने गेल्या अनेक दिवसापासून बदनामी करीत आहे. हरवाळकर हा कोणत्याही वृत्तपत्राचा पत्रकार नसल्याचे समजते, मात्र हा विविध संघटनेचा अध्यक्ष असल्याचा जनतेत संभ्रम निर्माण करून, तसेच मागासवर्गीय जातीचा गैरवापर करून अनेकांना त्रास देत आहे. याची पुरावे सोशल मिडीयावर उपलब्ध आहेत..!

या तथाकतीत व स्वयंघोषित पत्रकार स्वामिनाथ हरवाळकर यांनी भोसले परिवाराला बदनामी करून मोठी रक्कम लुबाडण्याचा दुष्ट हेतूने खोटी फिर्याद पोलिसात दिली आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो, आणि अँट्रॉसिटीचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी राजे फत्तेसिंह चौकातील सर्जेराव जाधव सभागृहात सर्व धर्मीय प्रमुखांची तातडीची निषेध बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत माऊली पवार हे बोलत होते.

प्रारंभी श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले. या बैठकीत बोलताना शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख म्हणाले की, भोसले पिता-पुत्रावर अँट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आम्ही पाळलेला कुत्रा शेजाऱ्याला चावेल असे वाटले नव्हते. त्याला आता कुचला घालण्याची वेळ आली आहे.

यावेळी बोलताना रिपाइं (आठवले गट) चे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे म्हणाले, हरवाळकर याचा अँट्रॉसिटीचा उद्देश आर्थिक लुट करणे व गैरवापर करून खंडणी गोळा करणे हा एक धंदा आहे. त्यांनी सोशल मिडीयावर सोडलेल्या पोस्ट्सचा हेतू काय आहे? याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

सोलापूरचे राजनभाऊ जाधव म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून लाखो स्वामी भक्तांना महाप्रसादासह विविध उपक्रम राबवून श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर घालण्याचे काम व जगभरात तीर्थ क्षेत्राचे नांव पोहचविण्याचे उल्लेखनीय काम करणाऱ्या भोसले पिता-पुत्रांना मुद्धाम लबाडीने गोवण्याचे षड्यंत्र आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी लागू केलेल्या कायद्याचा ह्या स्वार्थी व विघ्न संतोषी माणसाने गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूर संभाजी ब्रिगेडचे व नगरसेवक अमोलबापू शिंदे म्हणाले की, तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या जडणघडणीत जन्मेजयराजे भोसले यांचे मोलाचे योगदान आहे. भोसले पिता-पुत्र गेल्या दोन दिवसापासून अक्कलकोटमध्ये नसताना ही देखील त्यांच्यावर अँट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून, अशा प्रवृत्तीला वेळीच धडा शिकवा. त्यांचावरील खोटा गुन्हा त्वरित मागे न घेतल्यास अक्कलकोट व सोलापूर प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र बंद करू असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी प्रा.राहुल रुही, शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार, भारतीय लहूजी सेनेचे अध्यक्ष वसंत धेडे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, वडार समाजाचे अंकुश चौगुले, प्रहार संघटनेचे अध्यक्ष अमर शिरसाट, शिव-बसव डॉ.बी.आर.आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष संदिप (बाळासाहेब) मडीखांबे यांनी या घटनेच्या निषेध करून आम्ही सर्वजण भोसले पिता-पुत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

याप्रसंगी जेष्ठ समाज सेवक कुमार सागरे यांनी जाहीर निषेध करून खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा अन्यथा मी आत्मदहन करणार असा इशारा दिला.

यावेळी रासपचे जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब मोरे व शिवराज स्वामी यांनी ही भ्रमण ध्वनिवरून पाठींबा दर्शविले.

या निषेध बैठकीस श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, मनोज कल्याणशेट्टी, रासपाचे दत्ता माडकर, बाळा शिंदे, बालाजी पाटील, सुनिल खवळे, ऋषी लोणारी, माजी नगरसेवक किशोर सिद्धे, प्रसाद माने, सोहेलमास बागवान, प्रशांत गुरव, प्रविण देशमुख, पिंटू सोनटक्के, सचिन पवार, ऐजाज बळोरगी, धर्मराज गुंजले, बंटी राठोड, शिलामणी बनसोडे, विजय राठोड, डॉ.बसवराज बिराजदार, अभिजित लोकापुरे, पद्माकर डिग्गें, शिवु मंगरुळे, दिनेश लांडगे, राम मातोळे, मुबारक कोरबू, मुन्ना राठोड, प्रसन्न हत्ते, रणजीत गोंडाळ, रोहोन शिर्के, नागराज कुंभार, सतीश शिरसाट, बाबा सुरवसे, मनोज गंगणे, मंगेश फुटणे, मनोज निकम, पिंटू दोडमनी, शितल फुटणे, अमर पोतदार,पिंटू मचाले, रोहीत निंबाळकर, पिंटू घाडगे, बाळासाहेब घाडगे,कांत झिपरे , चंद्रकांत कुंभार, अभियंता अमित थोरात यांच्यासह अक्कलकोट मधील अनेक मान्यवर उपस्थित आहे.