Home यवतमाळ अतिवृष्टीमुळे घाटंजी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी भाजपाचे निवेदन

अतिवृष्टीमुळे घाटंजी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी भाजपाचे निवेदन

437

यवतमाळ – दि २९/०७/२०२२ रोजी तहसील कार्यालय घाटंजी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. घाटंजी तालुक्यामधील शेतकरी संकटात सापडला आहे. सुरवातीला जून महिन्यात पावसाचे पाणी नियमित न आल्याने शेतकऱ्यांना दुबार,तिबार पेरणीचे संकट आले होते.आणि नंतर जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाणी आल्याने अनेक शेतकऱ्याच्या शेत्या बुडीत गेल्या.अनेक पिके अति पावसाने करपून गेली.
तसेच प्रशासनाकडून पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी लावलेल्या यंत्रावरून काही मंडळामध्ये पाण्याची टक्केवारी कमी असल्याबाबत शेतकऱ्यांचा समज झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील काही मंडळ सुटणार असल्याची चर्चा आहे परंतु प्रशासनाचे इलेक्ट्रॉनिक यंत्रात बिघाड असू शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामा करण्यात यावा.शेतकऱ्याचे १००% नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांना कुठलेही निकष न लावता सर्वंकष नुकसान भरपाई देण्यात यावी.नुकसानभरपाई न दिल्यास शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले. त्यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते मा श्री चोपडे सर,श्री डहाके सर,भाजपा ता अध्यक्ष, सर्वश्री मोहन जाधव,जिल्हाध्यक्ष वि जा भ ज,बालुभाऊ खांडरे,शहर अध्यक्ष भाजपा,स्वप्नील मंगळे, आर्णी विधानसभा आदिवासी आघाडी, भावेशजी सूचक,संदीपजी धांदे,विजय चव्हाण,सचिन गाटले,सोनू गेडाम, अभिषेक कुंभारे,अनुप हेमके,विजय गिनगुले,कुणाल राऊत,अंमु देवतळे,शंकर कोडापे भाजपा नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.