प्रतिनिधी ( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही:- दि.26 जुलै २०२२ रिलायन्स फाऊंडेशन कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत डिजिटल फार्म स्कुल च्या माध्यमातून ऑडिओ कॉन्फरन्स द्वारे *सोयाबीन व तूर पीक कीड ,रोग व खत व्यवस्थापन* विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली, त्यात सध्या खरीप हंगामात, त्यातच बुलडाणा जिल्यातील प्रमुख पिक म्हणून सोयाबीन व तूर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते ,व शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिक रोग व खत व्यवस्थापन कसे करायचे या संबंधी बरेच प्रश्न होते. त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने. रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा, बुलडाणा व कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी दिनांक 26/०७/२०२२ रोजी बुलडाणा जिल्यातील ५० शेतकऱ्यांसाठी सोयाबीन व तूर पिक रोग व खत व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. धम्मदीप गोंडाने, रिलायंस फॉउंडेशन बुलडाणा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी केले.
या वेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री. प्रवीण देशपांडे (कीटक शात्रज्ञ् कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा ) यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन चक्रीभुंगा,लष्करी अळी, बीजप्रक्रिया चे महत्व या बद्दल शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निराकरण केले. तसेच ड्रॉ. भारती तिजारे कृषी शाश्त्रज्ञ् कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी तूर पिकावरील खत व्यवस्थापन, व तूर पिकाचे उत्पादन जास्त कसे घेता येईल या बद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी बुलडाणा जिल्ह्यातील सात गाव व चार तालुक्यातील 50 शेतकऱ्यांनी ऑडिओ कॉन्फरन्स चा लाभ घेतला या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.