नागपुर – हर घर तिरंगा झेंडा अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनाद्वारे शहर व् ग्रामीण मधे शाळ, ग्रामपंचायत, स्थानिक विक्री केंद्रे, राशन दुकान ना मार्फत जिल्हा व तालुका स्तरावरून प्रत्येक गावांमध्ये तिरंगा ध्वज याचे वाटप करण्यात येत आहे. पन त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावांमध्ये प्रत्येक शहरांमध्ये दोषपूर्ण झेंडे वितरित होत असल्याचे चित्र आहे. अनेक शहरी ग्रामीण नागरिकांना अजूनही झेंडा बद्दल चा सन्मान काय आहे त्याचं महत्त्व काय आहे हे अजून कळलेले दिसत नाही. त्यामुळे चुकीचे झेंडे मिळवूनही ते अजूनही तक्रार करण्यात समोर आलेले नाही व प्रशासनाला परत करत नाहीये . *अशा वेळी प्रत्येक प्रशासनाने नागरिकांना आवाहन करण्याची गरज निर्माण झालेली आहे अन्यथा तिरंगा व् देशाचा अपमान मोठ्याप्रमाणात झाल्याशिवाय राहणार नहीं. अति घाईने व तातडीने हे अभियान राबविण्यात येत असल्यामुळे या त्रुटी निर्माण होत आहे. वेळीच याची दखल सर्वांनी घेतली नाहीतर सर्वांवर तिरंग्याचा अपमान होण्याची नामुष्की ओढवली जाईल. असे व्हायचे नको असेल तर प्रत्येक नागरिकांनी सतर्क व्हावे व चुकीचा साईज असलेला झेंडा, फाटलेला झेंडा, अशोक चक्र एका डाव्या किंवा उजव्या साईडला गेलेला झेंडा, व्यवस्थित शिलाई न झालेले झेंडे, फिकट व कलर पसरले झेंडे वापरू नये तसेच ते प्रशासनाला परत करावा. अशा त्रुटी असलेले झेंडे फडकवू नयेत खादी किंवा रेशमी असलेला व कमीत कमी 3*2 फूट साईज असलेला सदोष तिरंगा झेंडा फडकविण्याचे आव्हान राष्ट्रनिर्माण संघटन नागपुर महाराष्ट्र द्वारा सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.