Home यवतमाळ शिवणी मंडळाला अतिवृष्टीत ग्रस्त घोषित करा अन्यथा तिव्र आंदोलन – मोहन जाधव

शिवणी मंडळाला अतिवृष्टीत ग्रस्त घोषित करा अन्यथा तिव्र आंदोलन – मोहन जाधव

282

यवतमाळ / घाटंजी – घाटंजी तालूक्यातील एकूण ७ मंडळातील ६ मंडळ अतिवृष्टी मधे समाविष्ट करण्यात आले असून शिवणी मंडळातील राजूरवाडी, जरुर, जरंग, सेवानगर, शिवणी, घाटूंबा, कोच्चि,आंबेझरी,मोवाडा, हिवरधरा, कोपरा वन, दडपापुर उमरहीरा हे अतिवृष्टी प्रभावित गावांना वगळल्याचे कृषी विभागाच्या ऑनलाइन अहवालातून निदर्शनास आले आहे, शिवणी मंडळातील अनेक गांवे खूनी नदीच्या काठावर वसलेले असून सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या महापुराने शेतकर्यांचे शेताचे अतोनात नुकसान झाले आहे, शेती खरडून गेल्याने वस्तूनिष्ट पंचनामा करून शिवणी मंडळ अतिवृष्टी ग्रस्त घोषित करण्याची मागणी मा.जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचेशी चर्चा करून निवेदन दिले आहे, अन्यथा शेतकारी तिव्र आंदोलन करतील असा इशारा मोहन जाधव जिल्हाध्यक्ष व्हीजेएनटी आघाडी यांनी निवेदनातून केले आहे.