प्रतिनिधी- धनराज खर्चान
अमरावती /भातकुली – अळनगांव येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव सोहळ्या निमित्त विविध घोषणाच्या गजरात रिमझिम पावसात गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. जि. प.शाळा अळनगांव येथे राष्ट्र पिता महात्मा गांधी व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या हस्ते ध्वज स्तंभाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर ग्राम पंचायत कार्यालय अळनगांव येथे गावातील प्रथम नागरिक तथा ग्राम पंचायत सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर सुंदर आवाजात देशभक्तीपर गीत गायन करणारे मौलाना हसन शाह यांच्या सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते ध्वज देवून सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,पोलिस पाटील,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा वर्कर,मदतनीस अंगणवाडी सेविका,शिक्षक वृंद ,तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक रिमझिम पावसात उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मा. भडांगे सर यांनी केले.