Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्यात जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक संपन्न..!

घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्यात जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक संपन्न..!

175

(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी, 23 ऑगस्ट : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्यात जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या वेळी पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विनोद चव्हाण, सावळी (सदोबा) दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) गजानन गजभारे या सह पारवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस पाटील, तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सह ईतर मान्यवर उपस्थित होते.

जातीय सलोखा व शांतता समितीची बैठकीत पोळा, तान्हा पोळा व गणपती उत्सव साजरा करण्याबाबत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीचे वाचन करण्यात आले. तसेच पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन 2015 ते 2022 पर्यंत झालेल्या एकूण गुन्हाच्या बदलत्या आकडे वारीचे वाचन, माहितीची स्पष्टता देण्यात आली. पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डला असलेल्या संवेदनशील गावांमध्ये झालेल्या गुन्हेगारीतील बद्दलाच्या आलेखाचे वाचन व माहिती आणि या गावांची आजची सद्यस्तिथी सुधारलेली परिस्थिती या विषयी माहिती देण्यात आली. सोबतच या गावातील झालेल्या बदला बाबत पोलीस पाटील, तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष, सरपंच व उपसरपंच यांच्या सहकार्याबद्दल कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. कुर्ली, चिखलवर्धा व ईतर गावातील वाद संपुष्टात आल्याची माहिती या वेळी ठाणेदार विनोद चव्हाण यांनी दिली. तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष व निवृत्त पोलीस पाटील आनंद मुनेश्वर (ताडसावळी), पोलीस पाटील सुरेश साबापुरे (शरद) आणि देवधरी येथील तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष दादाराव वानखेडे इत्यादींचा शाल व श्रीफळ देऊन पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, सावळी (सदोबा) दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला.

पारवा पोलीस स्टेशनची हद्द 102 गांवे मिळुन तयार करण्यात आली असून पोलीस पाटील संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राजेंद्र ठाकरे (देवधरी), उपाध्यक्ष प्रमोद बन्सोड (पोलीस पाटील, कापेश्वर), सचिव अण्णाजी भेंडारे (वाढोणा) व सहसचिव श्रीमती भाग्यश्री कुळसंगे आदींची 102 गावांतील पोलीस पाटील आदींच्या वतीने नव्याने अविरोध निवड करण्यात आली. ठाणेदार विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांच्या हस्ते या वेळी सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह ईतर सदस्य बैठकीला आवर्जून उपस्थित होते.
अशा तऱ्हेने आज पारवा पोलीस ठाण्यात जातीय सलोखा व शांतता समितीची बैठक पार पडली. सदरची यशस्वी बैठक पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, सावळी (सदोबा) दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे यांच्या मार्गदर्शनात व उपस्थित पारवा पोलीस स्टेशनचे बिट अंमलदार, पारवा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारे पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती गांव समितीचे अध्यक्ष, श्री. गणेश मंडळाचे अध्यक्ष व ईतर पदाधिकारी, युवक वर्ग आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. आभार सावळी (सदोबा) दुरक्षेत्रचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) गजानन गजभारे यांनी मानले.