Home वाशिम सर्वांनी आगामी सण-ऊत्सव शांततामय मार्गाने व कायद्याचे पालन करुन साजरे करा-श्री.यशवंत केडगे

सर्वांनी आगामी सण-ऊत्सव शांततामय मार्गाने व कायद्याचे पालन करुन साजरे करा-श्री.यशवंत केडगे

202

 

मंगरुळपीर येथे आगामी सण-ऊत्सवानिमित्य शांतता समितीची बैठक संपन्न

एसडिपिओ,ठाणेदार,तहसिलदार तथा सर्व विभाग प्रमुखांची ऊपस्थीती

वाशिम:-मंगरुळपीर येथील पंचायत समीती सभागृहामध्ये आगामी गणेशोत्सव आणी इतर सण ऊत्सवानिमित्य शांतता समितीची बैठक ऊपविभागिय पोलिस अधिकारी श्री.यशवंत केडगे साहेब यांच्या प्रमुख ऊपस्थीती आणी मार्गदर्शनात तथा मान्यवरांच्या ऊपस्थीतीत पार पडली.
सर्वांनी आगाणी सण ऊत्सव शांतता आणी सुव्यवस्थेत तथा शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन साजरे व्हावे,सर्व धर्मीय सलोख्याने आणी गुण्यागोविंदाने नांदाने व सर्व येणारे सण ऊत्सव सर्व मिळुन एकोप्याने साजरे व्हावेत यासाठी सर्वांनी सजग राहुन शांतता सुव्यवस्था नांदावी यासाठी सहकार्य करावे,सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करावा,श्री च्या विसर्जनाच्या मार्गाची दुरुस्ती करावी,सिसिटीव्हि कॅमेर्‍याची व्यवस्था,लोंबकळलेल्या तारांची व्यवस्था महावितरणे लावावी,गणेश ऊत्सव काळात विजपुरवठा खंडीत होवु नये याची काळजी घेण्याच्या सुचना यावेळी श्री.यशवंत केडगे यांनी दिल्या.ठाणेदार सुनिल हूड यांनी या बैठकीमध्ये लोकांना आवाहन केले की,सर्वांनी कायद्याचे पालन करावे,काही अनूचीत प्रकार लक्षात आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करन्याचे सांगीतले.पोलिस लोकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबध्द असुन ही शांतता व सुव्यवस्था बिघडवतील अशा प्रवृत्तीला ठेचायचीही पुर्ण तयारी पोलिसांनी केली आहे त्यामुळे कुणीही काळजी करु नये असे सांगीतले.यावेळी एसडीपिओ यशवंत केडगे,ठाणेदार सुनिल हुड,तहसिलदार शितल बंडगर,महावितरणचे साबळे,न.प.चे मुख्याधिकारी, निलेश भोयर,आरोग्य अधिकारी डाॅ.अजमल,पिएसआय तुषार जाधव,सुमित चव्हाण,रविंद्र कातखेडे,बिरबलनाथ महाराज संस्थानचे रामकुमार रघुवंशी,दर्गा ट्रष्टचे शमशोद्दीन जहागीरदार,तालुक्यातील सर्व पोलिस पाटील,शांतता समितीचे सर्व सदस्य,पञकार बांधव,विविध सामाजिक संघटना,सामाजिक कार्यकर्ते यांची ऊपस्थीती होती.कार्यक्रमाचे संचलन पिएसआय तुषार जाधव यांनी केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206