Home परभणी कोणत्याच वस्तूच्या बदल्यात न मिळणारी गोष्ट म्हणजे आईचं प्रेम- ह भ प...

कोणत्याच वस्तूच्या बदल्यात न मिळणारी गोष्ट म्हणजे आईचं प्रेम- ह भ प रोहिदास महाराज मस्के

227

 

गंगाखेड प्रतिनिधी

21व्या शतकात जगातील प्रत्येक गोष्टीला पर्याय आहेत. पैशाने त्या उपलब्ध होऊ शकतात. कोणत्याच गोष्टीच्या बदल्यात न मिळणारी एकमेव गोष्ट म्हणजे आई आणि तिचे प्रेम आहे. त्यामुळे प्रत्येकाने आई-वडिलांचा सांभाळ केला पाहिजे असं मत प्रसिद्ध कीर्तनकार रामानाचार्य हभप रोहिदास महाराज मस्के यांनी बुधवारी बोथी येथील विठ्ठल रुक्मिणी आश्रमात कीर्तनात बोलताना व्यक्त केलं.

महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार विनोदाचे बादशहा ह भ प गेजगे महाराज यांच्या आजीच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज म्हस्के यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कीर्तनात हभप मस्के महाराज यांनी आईची महती विशद केली. भौतिक सुविधांमध्ये लागणाऱ्या घर, शेती, वाहन आधी गोष्टी आपण विकत आणू शकतो. दुर्दैवाने एखादी बायको सोडून गेली अथवा मृत्यू पडली तर दुसरी आणता येते मिळते. पण एक वेळेस आई आपल्यातून निघून गेल्यास तिचे प्रेम आपल्याला मिळू शकत नाही. त्यासाठी प्रत्येकाने आई-वडिलांचा सांभाळ केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या कीर्तन सोहळ्यास आदमी आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भाऊ भोसले, नारायणराव डोणे, अर्जुन महाराज लटपटे, विक्रम बाबा इमडे आदी सह परिसरातील वारकरी भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.