Home वाशिम वाशिम जिल्ह्यात गोहत्या व गोवंश वाहतूक संदर्भात वर्षभरात १३ गुन्ह्यांमध्ये एकूण १९...

वाशिम जिल्ह्यात गोहत्या व गोवंश वाहतूक संदर्भात वर्षभरात १३ गुन्ह्यांमध्ये एकूण १९ आरोपींविरुद्ध कारवाई ; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

100

 

वाशिम:-प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये क्रूरपणे होणाऱ्या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश मांस बाळगणे किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत आरोपींवर वाशिम पोलीस दलातर्फे वेळोवेळी कारवाई केली जाते.


मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्या आदेशान्वये वाशिम जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देऊन जास्तीत जास्त कारवाया करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दि.२६.०८.२०२२ रोजी पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीत पो.नि.योगेश इंगळे हे स्टाफसह पोळा बंदोबस्त संबंधाने परिसर पेट्रोलिंग करत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून कामरगाववरून येणाऱ्या बोलेरो पिकअप गाडी क्र.MH 30 BD 3926 ला खेर्डा चौकामध्ये अडवून सदर वाहनाची तपासणी केली. त्या वाहनात निर्दयतेने कोंबून भरलेल्या अवस्थेत ०६ बैल बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सदर वाहनचालक अब्दुल अजिब मोहम्मद कासम व सय्यद अह्फाज सय्यद अबरार यांना ०६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सदर आरोपींवर पो.स्टे.कारंजा ग्रामीण येथे कलम ११(१) घ, च प्राण्यांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० सहकलम ५ (अ) महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम सहकलम १३०/१७७ मोटार वाहन कायदा प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने सन २०२२ मध्ये आतापर्यंत गोमांस वाहतूक संदर्भात ३ गुन्हे दाखल असून अवैध प्राणी वाहतूक संदर्भात प्राणी संरक्षण अधिनियम व क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अन्वये १० गुन्हे असे एकूण १३ गुन्ह्यांमध्ये एकूण १९ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून एकूण ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये गोवंश जातीचे ३० जनावरे, ६० म्हशी व ०१ बकरीची सुटका करण्यात आली आहे. त्यामध्ये पो.स्टे.वाशिम शहर येथे ०१ गुन्हे, पो.स्टे.मंगरूळपीर येथे ०२ गुन्हे, पो.स्टे.अनसिंग येथे ०३ गुन्हे, पो.स्टे.आसेगाव येथे ०३ गुन्हे, पो.स्टे.कारंजा शहर येथे ०१ गुन्हे, पो.स्टे.कारंजा ग्रामीण येथे ०२ गुन्हे, पो.स्टे.मानोरा येथे ०१ गुन्हा असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS) यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे(IPS), पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांच्या विशेष पथकाने मोलाची कामगिरी बजावली आहे. नागरिकांनी अश्याप्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्ष वाशिम किंवा Dial 112 किंवा संबंधित प्रभारी पोलीस अधिकारी यांना माहिती द्यावी, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206