मुक्ताईनगर:{आनंद पाटील}
जलगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदे शेती शिवारात वीज पडल्याने एक ठार तर दोन तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
उचंदे शिवारात माणिक जगन्नाथ पाटील यांच्या शेतात काम सुरू असताना विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आल्याने गणेश माणिक पाटील (वय ३४), मुकेश अशोक पाटील (वय ३३ ) , आणि शत्रुघन काशीनाथ धनगर (वय ३५) हे तिघे जवळच्या निंबाच्या झाडाखाली उभे राहिले आणि या झाडावर वीज कोसळली.
यात शत्रुघन धनगर यांच्या अंगावर वीज पडल्याने ते ठार झाले तर मुकेश पाटील आणि गणेश पाटील हे जखमी झाले आहेत. दोघांवर मुक्ताईनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तिघे तरुण शेतकरी कुटुंबातील असून या दुर्दैवी घटनेने उचंदा येथे शोककळा पसरली आहे.