Home वाशिम शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी सामाजीक कार्यकर्त्या ज्योतीताई ठाकरेची तहसिलदारांसोबत चर्चा

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी सामाजीक कार्यकर्त्या ज्योतीताई ठाकरेची तहसिलदारांसोबत चर्चा

200

अतिवृष्टीचा मदतनिधी बाधित शेतकर्‍यांना त्वरीत देण्याची मागणी

मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांची दिवाळी गेली अंधारातच

अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वचा शेतकऱ्यांना फटका

वाशिम:-अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांना वेळेत मदतनिधी न मिळाल्याने यंदाची दिवाळी अंधारात गेली असुन भ्रष्टाचार करुन मलिदा लाटणार्‍या अधिकार्‍यांची माञ चांदी झाल्याचे चिञ वाशिम जिल्ह्यासह मंगरुळपीर तालुक्यात दिसते.रब्बी पिकांची लगबग असतांनाही व दिवाळी कधीचीच संपुनही बाधित शेतकर्‍यांना मदतनिधी न मिळाल्यामुळे सामाजीक कार्यकर्त्या ज्योतीताई मनोज ठाकरे यांनी तहसिलदार यांची भेट घेवुन चर्चा केली व त्वरीत मदतनीधी शेतकर्‍यांना वितरीत करण्याची मागणी केली.
जुलै महिन्यांत विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली होती. वाशिम ,अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते.पण हे अतिवृष्टीबाधित शेतकरी अजुनही मदतीविनाच राहिले असल्यामुळे दिवाळसण अंधारातच गेला आहे.राज्य सरकारकडून विदर्भातील अतिवृष्टी बाधितांसाठीचा मदत निधी २१ सप्टेंबर रोजी संबंधित तहसीलदारांकडे वर्ग झाला आहे. तलाठी, कृषी साहाय्यक, ग्रामसेवक यांनी अतिवृष्टी बाधितांचे सर्व्हेक्षण, माहितीचे संकलन पूर्ण केले आहे. मात्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक जमा करून संबंधित बँकांना त्याची माहिती कुणी द्यायची, या बाबत समन्वय नसल्यामुळे अतिवृष्टी बाधितांना सरकारी मदत मिळण्यास उशीर झाला. पंधरा सप्टेंबरपासून ही मदत मिळू लागली आहे. पण, अद्याप अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.जुलै महिन्यांत विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली होती. वाशिम,अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेऊन राज्य सरकारच्या वतीने खरीप पिकांसाठी प्रति हेक्टर १३, ६०० आणि फळपिकांसाठी २६,००० रुपये या निकषांनुसार मदत मिळणार आहे. या बाबतचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तहसीलदारांकडे २१ सप्टेंबर रोजी वर्गही झाला आहेअसे कळले. पण, यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकरी वगळता अन्यत्र अद्यापही बाधित शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागातील समन्वयाच्या अभावामुळे ही मदत मिळू शकली नाही. मुळात या तीनही घटकांनी आपल्या वाट्याचे काम पूर्ण केले आहे. आता आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांकांची यादी संबंधित बँकांना देणे आणि मदत मिळाली त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविणे इतकेच काम बाकी आहे. यापूर्वी हे काम तलाठी करीत होते. पण, आता त्यांनी हे काम करण्यास नकार दिला आहे. आमच्या वाट्याला आलेल्या गावांतील बाधित शेतकऱ्यांचेच आधार क्रमाक आणि बँक खाते क्रमाकांची माहिती देणार. कृषी आणि ग्रामसेवकांकडील गावांतील बाधितांचे आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमाकांची माहिती आम्ही देणार नाही, अशी भूमिका तलाठ्यांनी घेतली होती. कामांच्या काटेकोर विभागणीची गरज
शेतकऱ्यांना वेळेवर मदत करण्याची जबाबदारी प्रशासनाची असतानाही संघटना शिरजोर झाल्या आहेत. तलाठी, कृषी साहाय्यक आणि ग्रामसेवकांच्या संघटनांनी कामांवर बहिष्कार टाकला होता. विभागीय महसूल आयुक्तांनी बैठक घेऊन आदेश दिल्यानंतर या संघटनांनी बहिष्कार मागे घेऊन काम सुरू केले आहे. पण, शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण असतानाही संघटना एकमेकांकडे बोट दाखवून काम टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. पंतप्रधान पीकविमा योजना, किसान सन्मान निधी योजना, अतिवृष्टी बाधितांना मदत देण्याच्या कामांत कृषी, महसूल आणि ग्रामविकास खात्याने करावयाच्या कामांची नव्याने आणि काटेकोरपणे विभागणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.विभागीय कृषी संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या आदेशानंतर बहिष्कार मागे घेऊन शेतकरी हितासाठी काम सुरू केले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. आमच्या तुलनेत तलाठी आणि ग्रामसेवकांची संख्या जास्त आहे. कामाची विभागणी करताना याचा विचार होत नाही. आता अडचण म्हणून हे काम आम्ही केले आहे. पण, यापुढे प्रशासनाने हे काम आमच्यावर लादू नये असे ग्रामसेवक संघटनांनी ठणकावुन सांगीतले होते.शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांची यंदाची दिवाळी गोड होणार अशी आशा असतांना माञ महसुल विभागाच्या भ्रष्टाचारी वृत्ती आणी कासवगतीच्या कामकाजप्रणालीमुळे दिवाळी माञ अंधारात गेली.अजुनही शेतकरी मदतीपासुन वंचित असल्यामुळे प्रशासनाप्रती रोष व्यक्त केल्या जात आहे.आता शेतकरी व विविध संघटना रस्त्यावर ऊतरुन शेतकर्‍यांना मदत मिळवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे कळले आहे.यानिमित्ताने महसुलची शेतकर्‍याप्रती असलेली ऊदासिनता माञ चव्हाट्यावर आली आहे.सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई ठाकरे यांनी येथील तहसिलदाराची भेट घेवुन माहीती घेतली व त्वरीत अतिवृष्टीने बाधित शेतकर्‍यांना मदतनिधी देण्याची मागणी केली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशीम
मो.8459273206