Home यवतमाळ देऊरवाडी(लाड) येथे काकड आरती समाप्ती

देऊरवाडी(लाड) येथे काकड आरती समाप्ती

82

 

दारव्हा तालुक्यातील देउरवाडी (लाड) या गावी कार्तिक मासा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या काकडा आरतीची भक्तीभाव व उत्साहाच्या वातावरणात समाप्ती करण्यात आली.
कार्तिक मास सुरुवात झाल्यापासून ते दि. 8 नोव्हेंबर पर्यंत अखंड दररोज काकडा आरती व ग्रामदेवतांचा अभिषेक नित्यनेमाने करण्यात आला. काकड आरती दरम्यान पहाटेच भूपाळी , भजन , किर्तन ,पूजन आदी कार्यक्रम दररोज घेण्यात आले. दि. 8 नोव्हेंबर रोजी कार्तिक मास काकडा आरती समाप्ति निमित्ताने पहाटे ६ वाजता सामूहिक काकडा आरती करण्यात आली . दुपारी १२ वाजता ग्रामप्रदक्षिना करुन काला वाटण्यात आला . महिनाभर ज्या भाविकांनी काकडा आरती केली त्यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी लोकसहभागातुन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . गावातील काकड आरतीची परंपरा कायम ठेवण्यासाठी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घनश्याम बोचरे, दिपक ठोकळ ,अतुल बोबडे, सचिन लांडे, नितीन रोकडे , सतीश वगारे , योगेश ठोकळ, मनोहर इंगळे ,संदीप वानखडे ,नारायण सावदे ,राज बोबडे , राम शेळके , सुभाष रोकडे ,ज्ञानेश्वर काळबांडे दत्तात्रय काळबांडे , प्रविण गायकवाड, बालू केणे तसेच गावातील समस्त गावकरी व बालगोपालांनी परिश्रम घेतले.