Home उत्तर महाराष्ट्र साडे पाचशे वीज कर्मचाऱ्यांचा तांत्रिक युनियन 5059 मध्ये जाहीर प्रवेश

साडे पाचशे वीज कर्मचाऱ्यांचा तांत्रिक युनियन 5059 मध्ये जाहीर प्रवेश

105

वीज कामगार चळवळीच्या राज्यातील ऐतिहासिक घटना

तांत्रिक कामगार युनियनच्या पहिल्या वर्धापन दिनाला कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे : तांत्रिक कामगार युनियन 5059 चा पहिला वर्धापन दिन पुणे येथे शुक्रवारी मोठया उत्साहात पार पडला. या पहिल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पुणे सर्कल मधील साडे पाचशे वीज कामगारांनी जाहीर प्रवेश घेतला. पहिल्या वर्धापन दिनाला पाचशेच्या वर वीज कामगारांनी प्रवेश घेण्याची राज्यातील पहिलीच घटना असल्याचे मत व्यक्त होत आहे. या पहिल्याच वर्धापन दिनाला वीज कर्मचाऱ्यांचा राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वीज कंपनीतील कामगारांच्या न्याय हक्कासाठी अल्पावधीत संपूर्ण राज्यभर झंझावात पेटवणाऱ्या तांत्रिक कामगार युनियनचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात पार पडला. पुणे पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्याचे अध्यक्ष तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने, केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण, शिवाजी शिवनेचारी, संजय उगले, राज्य सचिव आनंद जगताप, केंद्रीय संघटक महेश हिवराळे, केंद्रीय कोषाध्यक्ष गजानन अघम पाटील, तांत्रिक टाईम्सचे संपादक सुनील सोनावणे, उपसंपादक विवेक बोरकर, संस्थापक अध्यक्ष किरण कऱ्हाळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश वाघ, वि क्षे. तां. काम. सह. पतसंस्था पुणेचे अध्यक्ष महेश पाटील अहमदनगरचे कामगार नेते सतीश भुजबळ, शंकर जारकड, माउली बडदे, प्रादेशिक सचिव संजय गाडगे, स्वामी, अशोक चव्हाण, सुरेश माळवे, हनुमंत शिंदे,कंत्राटी कामगार असोसिएशन चे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस शेख राहील, अनिल चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरवातीला पुणे येथील प्रादेशिक संचालक कार्यालय प्रवेश द्वाराजवळ युनियनचे वार्ताफलक अनावरण सोहळा पार पडला. नंतर कार्यक्रम स्थळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक पुणे झोन अध्यक्ष शरद डगळे यांनी केले. या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पुणे झोन मधील पाचशे पन्नास वीज कर्मचाऱ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संघटनेची ध्येयधोरणे व विचार सर्व सामान्य तांत्रिक कामगारापर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच तिन्ही वीज कंपनीमध्ये होऊ घातलेले खाजगीकरण आणि आणि इतरही कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविणे 2023 ची प्रस्तावित पगार वाढ यावर सभासदांच्या सूचना घेऊन त्यावर मंथन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन चंद्रशेखर बधे यांनी केले. तर पुणे झोन सचिव विलास निमसटकर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील पदाधिकारी सभासद विलास निमसटकर, इंद्रजित खरबस, महेश पाटील,शरद डगळे, चंद्रशेखर बधे, सूर्यकांत सांडभोर, दत्तात्रय रायकर, संतोष खताळ, चंद्रकांत दरेकर, संजय जोगदंड, श्रीकांत टाक ,चौबे,संदीप साळुंखे,अशोक मुळे, राधाकृष्ण होंडे,अंकुश गोचडे,सचिन चौधरी,उदय लाड,राजेंद्र गोटल,अशोक नागरगोजे, प्रशांत शेवते, सिद्धांत गणोरकर,निलेश बांगर,वैभव राऊत, सुनील शेळके,ओम होंडे,संतोष हंबर्डे,यश साळुंखे,निलेश सुर्यवंशी,सर्जे,कापसे तसेच दळवी मॅडम,राजपूत मॅडम व महिला सभासद इत्यादी..
………
आदीनी परिश्रम घेतले.
——————-
बॉक्स

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू : दिलीप कोरडे

कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी आपल्या तांत्रिक कामगार युनियन चे पदाधिकारी सदैव तत्पर असतील. खाजगीकरणाचे वारे आपल्या वीज कंपनीत वाहत आहे त्याला हाणून पाडण्यासाठी तसेच कामगार अस्तित्वाच्या प्रश्नावर वेळप्रसंगी तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ असे मत केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

युनियन सामान्य तांत्रिकाचा आवाज म्हणून पुढे येईल- बी आर पवार
तांत्रिकांचे प्रश्न व त्यांच्या पुढील आव्हाने होत असलेली पिळवणूक हेच कामगारांच्या दशेची कारणे असून येत्या काळामध्ये सामान्य तांत्रिकाचा आवाज म्हणून तांत्रिक कामगार युनियन ही पुढे असेल व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल…

पळपुटे नाही तर आम्ही लढवय्ये मावळे – प्रभाकर लहाने

वीज कामगारांचे प्रश्न सोडवण्याऐवजी प्रशासनाशी हात मिळवणी करण्याचे पाप आम्हाला आमच्या माथी पाडायचे नाही. आंदोलनाची नोटीस देऊन पळ काढणारे मावळे आम्ही नाही तर लढवय्ये सैनिक म्हणून वीज कामगारांच्या प्रश्नासाठी लढत राहू असे आश्वासन यावेळी केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी आपल्या भाषणातून दिले.

अब्दुल सलाम साहेबांचा विचार पुढे नेणार- शिवाजी शिवनेचारी
तांत्रिक कामगारांच्या विचारांची फारकत घेऊन संघटनेला एक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पुणे झोन मधील 553 तांत्रिक कामगारांनी भरकटलेल्या व दिशाहीन झालेल्या संघटनेचा त्याग करून नवी दिशा नवा विचार घेऊन कर्मयोगी तांत्रिक कामगार नेते अब्दुल सलाम साहेब यांच्या विचार पुढे नेणाऱ्या तांत्रिक कामगार युनियन मध्ये जाहीर प्रवेश केला असल्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र तांत्रिकमय करणार असल्याचा विश्वास उपसरचिटणीस शिवाजी शिवनेचारी यांनी व्यक्त केला…