जळगाव:(शाह एजाज़ गुलाब)
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील दिव्यांगांचा मूलभूत प्रश्न सुटावा व त्यांचे पुनर्वसन, तसेच जलद विकास व्हावा या हेतूने स्वतंत्र दिव्यांग (विभाग) मंत्रालयाची घोषणा झाल्याने महाराष्ट्र सरकारचे, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, ज्यांनी दिव्यांग विभागाचा सतत पाठपुरवठा केला ते माजी मंत्री आमदार श्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या सह सर्व मंत्री गण सोबतच सर्वच लोकप्रतिनिधी विधानसभा, विधान परिषदेतील सन्माननीय आमदार यांचे जाहीर आभार सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे मांडण्यात आले.
या दिव्यांग विभागाची घोषणा झाल्याने त्याची अंमलबजावणी ही लवकर झाल्यास दिव्यांगांचा राहिलेला विकास व सकारात्मक पुनर्वसन त्वरित होऊ शकते. महाराष्ट्र शासनाने या दिव्यांग विभागाची घोषणा केल्यामुळे दिव्यांगांतर्फे मान्यवर लोकप्रतिनिधी यांचा नुकताच प्रतिनिधीक स्वरूपात गौरव करण्यात आला असून यात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्रिमंडळातील कर्तव्यदक्ष पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आदरणीय ना.गुलाबरावजी पाटील, ग्रामविकास, क्रीडा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय ना.गिरीशभाऊजी महाजन यांच्यासह विधानसभा सदस्य आमदार राजुमामा भोळे, आमदार किशोरआप्पा पाटील यांचा दिव्यांग प्रतिनिधी म्हणून सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन, दिव्यांग केंद्रा तर्फे मुकुंद गोसावी, सोपानराव गणेशकर, डॉ.एम व्ही पटेल,धनंजय पाटील, दिलीप खामकर, वैभव निकुंभ,जयेंद्र पाटील, राकेश कोल्हे आदीं तर्फे गौरव करण्यात आला.
स्वतंत्र दिव्यांग विभाग अस्तित्वात येत असल्यामुळे राज्यातील बिकट अवस्थेत असलेल्या घटकाला खरा व सकारात्मक न्याय मिळून मोठ्या प्रमाणात विकासाचे कार्य होईल तसेच दिव्यांगांच्या मनात असलेला न्यूनगंड यामुळे दूर होऊन दिव्यांग निश्चितच स्वयंभू होईल. कारण दिव्यांगांना दयेची भीक नको तर कार्य स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मायेचे बळ व सेवेची संधी हवी. आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या पाठपुराव्याने हा विभाग निर्माण झालेले त्यांच्यासह सर्वच मंत्री गण लोकप्रतिनिधी यांचे मनापासून आभार फक्त या विभागाची जलद गतीने अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्हीही पाठपुरावा करू मुकुंद गोसावी दिव्यांग प्रतिनिधी