Home मराठवाडा मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांची संघटना स्थापन,अध्यक्षपदी रविंद्र वाटेकर कायम,गुंतवणूकदारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांची संघटना स्थापन,अध्यक्षपदी रविंद्र वाटेकर कायम,गुंतवणूकदारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

86

 

जालना -लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय उद्योग समुहाने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यामुळे गुंतवणूक केलेला पैसा परत मिळावा म्हणून राज्यभरातील गुंतवणूकदार एकवटले असून शासन आणि प्रशासनाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.संघर्ष समितीचेच रूपांतर संघटनेत झाले आहे.असे या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता कदम यांनी जाहिर केले आहे.मैत्रेय प्रतिनिधी आणि गुंतवणूकदार संघटनेच्या अध्यक्षपदी धडाडीचे कार्यकर्ते रविंद्र वाटेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
या संघटनेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण मैत्रेय पिडीत सदस्य यांच्यासाठी आहे.तळागाळातील गोरगरिबांचा कष्टाचा पैसा परत मिळालाच पाहिजे हा एकमेव उद्देश या संघटनेचा राहणार आहे.या संघटनेस शासनाने रितसर परवानगी दिली असून संघटनेत सभासदांच्या हिताचीच कामे केली जातात.इतर कुणी सभासदांची दिशाभूल करत असेल तर संघटना कायदेशीर कारवाई करू शकते,असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष कदम,गुंतवणूकदारांचे अध्यक्ष रविन्द्र वाटेकर,तसेच सभासद सुचित दुसाने,रामराव मोरे,उदय संखे,कोमल शेरकर,माधुरी बागुल,सुमन कदम,हेमलता पाटील,विष्णू संकपाळ,मयुर शिरोडे,कैलास मालपाणी,सर्जेराव जाधव,कल्पना महाजन,राजेश्वरी हांडगे,बापूराव डोके,हरपनहळ्ळी,अमिता बारी,संजय बारी,संतोष तेली,जयवंत मुसळे,उमाकान्त पवार यांचे मैत्रेय पिडीत गुंतवणूकदारांचे वतीने अभिनंदन केले जात आहे.