⏩ घाटंजी तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या तर्फे सत्कार..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 28 नोव्हेंबर – माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांची भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केल्या बद्दल घाटंजी तालुका भाजपाच्या वतीने त्यांच्या चंद्रपुर येथील निवासस्थानी जाऊन घाटंजी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ भाजपा नेते मधुसुदन चोपडे सह इतरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुसुदन चोपडे, विमुक्त जाती जमाती भटक्या जमातीचे अध्यक्ष मोहन जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजु शुक्ला, माजी भाजपा शहर अध्यक्ष विष्णू नामपेल्लीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक यमसनवार, जिल्हा सरचिटणीस अशोक राठोड, आर्णी विधानसभा आदिवासी आघाडी प्रमुख स्वप्नील मंगळे, माजी सरचिटणीस जिवन मुद्देलवार, संदीप माटे, भाजपा युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष भावेश सुचक, सोशल मिडिया संयोजक गोपाल काळे, विक्की जिल्लडवार (पारवा), रावडी राठोड आदीं मान्यवर उपस्थित होते.