Home यवतमाळ सायफळ घाटावरून सुरू असलेल्या रेती तस्करीला अभय कोणाचे

सायफळ घाटावरून सुरू असलेल्या रेती तस्करीला अभय कोणाचे

101

रात्रंदिवस सुरू आहे रेतीचा उपसा

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील विदर्भ मराठवाडा सिमेवर असलेल्या सायफळ लगत पैनगंगा नदी वाहते या पैनगंगा नदीपात्रातून राजरोसपणे सात ते आठ ट्रक्टर द्वारे दिवस रात्र रेतीचा उपसा सुरू असून याकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक डोळे झाक करीत असल्याचे दिसून येत आहे गेल्या दोन महीण्यापासून सुरू असलेल्या अैवध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल आणि पोलीस कोणत्याही प्रकारचे पावले उचलली नसल्याचे पाहायला मिळत आहे सदर सायफळ रेती घाट घाटंजी तहसील पासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर पारवा पोलीस स्टेशन पासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे मात्र सदर घाटाकडे दोन महीण्यापासून ना महसूल अधिकारी फिरकले ना पोलीस अधिकारी फिरकले यामुळे पोलीस व महसूल च्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केली जात आहे सदर घाटावरून दिवस रात्र रेतीचा उपसा करून लगतच्या किनवट तालुक्यातील उनकेश्वर लिंगी बोथफाटा घाटंजी तालुक्यातील रोहीपेंड सायफळ चिखलवर्धा गोविदपूर येथे वाहतूक केली जात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती तस्करी ला अभय कुणाचे आहे हे न समजणारे च कोडे आहे सतत आठ दिवसापासून वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करण्यात येत आहे,मात्र अजूनही महसूल सह पोलीसांनी लक्ष वेधलेले दिसत नाही त्यामुळे सायफळ घाटावर सुरू असलेली रेती तस्करी बंद होणार की नाही हि शंकेचीच बाब आहे सायफळ रेती घाटावर कारवाई होईल का हे पाहणे अपेक्षित आहे.