➡️ सरपंच वर्षा कणाके हिचे सरपंच पद कायम..!
( अयनुद्दीन सोलंकी )
————————–
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने सरपंच वर्षा भिमराव कणाके हिला यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी अपात्र घोषित केले होते.
मात्र, सरपंच वर्षा कणाके हिने अमरावती विभागीय अपर आयुक्त निलेश सागर यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. तदनंतर सदर प्रकरणात सुनावणी होऊन चिखलवर्धा सरपंच वर्षा भिमराव कणाके हिला अपर आयुक्त निलेश सागर यांनी ११ नोव्हेंबर रोजी अंतरिम स्थगिती दिली आहे. या आदेशामुळे वर्षा कणाके हिचे सरपंच पद कायम राहीले आहे. अपीलकर्ता सरपंच कणाके हिची बाजु ॲड. आनंदराव माहुरे यांनी मांडली.
- चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिने शासकीय जमीनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य सुनंदा भिमराव कुडमेथे व ईतर तिन सदस्यांनी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयात केली होती. सदर प्रकरणात सुनावणी होऊन सरपंच वर्षा कणाके हिने शासकीय जमीनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप विभागीय अभियंता यांच्या अहवालावरुन सिद्ध झाल्याने सरपंच कणाके हिला अपात्र घोषित करण्यात आले. सदर आदेशाविरुद्ध सरपंच वर्षा कणाके हिने अमरावती विभागीय अपर आयुक्त निलेश सागर यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. सदर प्रकरणात सुणावणी होऊन ११ नोव्हेंबर रोजी अंतरिम स्थगिती देण्यात आली. अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सुनंदा कुडमेथे यांची बाजू ॲड. परमेश्वर अडकीने यांनी मांडली होती.