Home विदर्भ हू..हू.. थंडीत हजारोंचा गर्रम हंडी वर ताव बहिरम यात्रेत उसळतेय अलोट गर्दी...

हू..हू.. थंडीत हजारोंचा गर्रम हंडी वर ताव बहिरम यात्रेत उसळतेय अलोट गर्दी २ वर्षांनंतर पहिल्यांदाच यात्रेला आले भव्य रूप

159

अमरावती / मनिष गुडधे : जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध श्री क्षेत्र बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आली असून येथे दररोज हजारों भाविकांची गर्दी उसळत आहे. गुलाबी थंडीत गर्रम हंडीवर ताव मारण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या गर्दीने यात्रा परिसर गजबजून गेला असून गेल्या २ वर्षांनंतर पहिल्यांदाच यात्रेला भव्य स्वरूप आले आहे. विदर्भ भरातील भाविक व नागरिक या यात्रेचा आनन्द लुटण्यासाठी बहिरम कडे धाव घेत असल्याने येथील व्यापारी, दुकानदार, हॉटेल चालकानीं समाधान व्यक्त केले. पौष महिन्यातील दर रविवारी बहिरम यात्रेत पाय ठेवायला हि जागा मिळत नाही. भाविक जिथे जागा मिळेल तेथे रोडगा पार्टीचा आंनद घेत असून, हंडीत शिजवलेल्या मटणाची चव चाखण्यासाठी खवय्याचे जत्थे च्या जत्थे बहिरम च्या दिशेने रवाना होत आहेत. आणखी १५ दिवस हि यात्रा सुरु राहणार आहे.

रविवारी बहिरम यात्रेत ६५ हजार पेक्षा जास्त नारळ फुटले; मागील रविवार पेक्षा दुप्पट गर्दी या रविवारी होती अशी माहिती बहिरम संस्थान च्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावर्षी या सगळ्यात मोठ्या यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले असून पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. भैरवनाथ बहिरम बाबा अनेकांचे कुलदैवत असून दरवर्षी पौष महिन्यात हि विदर्भातील सर्वात मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर वसलेले हे गाव या यात्रेमुळेच सर्वदूर प्रसिद्ध आहे.

पूर्वी येथील तमाशे सगळ्यांचे आकर्षण होते. परंतु आता तमाशाचे फड लावण्यावर बंदी लागू आहे. येथील हंडी मटणाची क्रेझ व रोडगे पार्टी करण्याची प्रथा कायम असल्याने यात्रेकरूंचा ओघ कायम आहे.