सविता माने – गारगोटी/कोल्हापूर – संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यालाच नव्हे तर अखंड भारत देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सोव कोल्हापूरच्या काडसिध्देश्वर स्वामींच्या कणेरीमठात सध्या सुरू आहे तर त्याच कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवसंपन्न समृध्द अशा भुदरगड तालुक्याच्या मोठ्या जंगलांना अगणित ठिकाणी आगी लागून अब्जावधी वंन्यजीव, पशू पक्षी, मौल्यवान अशा दुर्मिळ वनस्पतींचा नायनाट होत आहे.हे सारे वंन्यजीव दररोज जंगलांना लागणाऱ्या आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत.ही बाब अत़्यंत गंभिर असून पर्यावरण रक्षण व समृध्दीसाठी सुरू असलेल्या या कणेरी मठाच्या लोकोत्सवाला हा घरचा आहेर असल्याचे परखड मत ‘पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र’ संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व पर्यावरण संरक्षण ल संवर्धन संस्था भुदरगड चे अध्यक्ष पत्रकार सुभाष माने यांनी आमच्या प्रेस मिडियाशी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की,”सह्याद्रीच्या पश्चीम घाटमाथ्यावरील,दाजीपूर अभयारंण्याच्या सिमेला लागून असल्ल्या या साऱ्या विस्तारीत जंगलाला बहुसंख्य ठिकाणी दररोज आगी लागत आहेत. आंम्ही अनेकवेळा ही बाब वन विभाग गारगोटीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देवूनही त्यांच्याकडून या आगी विझवण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.गेले आठ दिवस भुदरगड तालुक्यातील पर्यटनासाठी व पर्यावरणासाठी समृध्द असलेल्या राज्यमहामार्गाच्या परिसरातील या जंगलांना आगी लागत असताना स्थानिक वन कर्मचाऱ्यांच्याकडून या आगी विझवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.अशा वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भुदरगड तालुक्याच्या पर्यारण संरक्षण,संवर्धन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.या आगीसंदर्भात कोल्हापूरच्या जिल्हा वनसंरक्षण विभागाला जबाबदार धरणार असल्याचे या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष माने यांनी याप्रसंगी आमच्या प्रेस मिडियाशी सांगितले.यावेळी या पर्यावरण संरक्षण व संवर्धन संस्था भुदरगड चे उपाध्यक्ष प्रशांत पुजारी,सदस्य जंगल अभ्यासक दत्ता मोरसे, वाईल्डलाईफ फोटोग्राफर विजय पाटील, टाईम्स ऑफ भुदरगड च्या कार्यकारी संपादिका सविता माने आदि उपस्थीत होत्या.
पत्रकार सुभाष माने, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र)
प्रशांत पुजारी उपाध्यक्ष, पर्यावरण संरक्षण व संवर्धन संस्था भुदरगड