Home बुलडाणा मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता पोलिसांनी चोघांना घेतले ताब्यात ,

मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता पोलिसांनी चोघांना घेतले ताब्यात ,

108

मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता ,

 

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू , ,

प्रताप मोरे

मेरा खुर्द ,

बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वधर्मीय व सर्व जातीपंथांच्या नागरिकांनी काल हर्षोल्हासात साजरी केली असताना, काही समाजकंटकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला सध्या मेरा खुर्द गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आलेली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी गावात तळ ठोकून बसलेले आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ठाणेदार गणेश हिवरकर यांनी केले आहे. वृत्त लिहोस्तर या प्रकरणी पोलिसांची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे