Home महत्वाची बातमी वैशाख पौर्णिमा व महत्त्वाच्या घटना…!

वैशाख पौर्णिमा व महत्त्वाच्या घटना…!

82

सोशल मिडिया वरून

*अखिल विश्वाला दया, क्षमा, करुणा, शांती, सत्य व अहिंसा याची शिकवण देणारे* *महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही ऐतिहासिक घटना म्हणजे ‘बुद्धपौर्णिमा*’ !

*सर्वांना या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*…!!!
– सांध्य.
*बुद्धं सरणं गच्छामी* !
*धम्मं सरणं गच्छामी* !!
*संघं सरणं गच्छामी* !!!

*अत्त दीप भव*

*बुध्द पौर्णिमा (वेसाक्को पौर्णिमा/वैशाख पौर्णिमा*)

*तथागत भगवान सिध्दार्थ गौतमांच्या जीवनात सर्व पौर्णिमांचे महत्त्व आहे।त्यामध्ये विशेषतः वैशाख पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे*।

तथागतांच्या जीवनातील काही महत्त्वांच्या खालील घटना वैशाखी पौर्णिमेच्या असल्याने जगातील बौद्ध धर्मीय लोक वैशाखी पौर्णिमा मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरी करतात।

(१)कपिलवस्तुचा राजा शुध्दोधन आणि राणी महामाया याचा राजपुत्र सिध्दार्थ गौतमाचा जन्म लुम्बिनी वनात शाल व्रुक्षाखाली इ.स.पू. ५६३ वैशाख पौर्णिमा.वार मंगळवार.

(२)राजपुत्र सिध्दार्थ गौतमाचा व युवराज्ञी यशोधरेचा विवाह १६ व्या वर्षी – इ.स.पू. ५४७. वैशाख पौर्णिमा.

(३) सिध्दार्थ गौतमाला सम्यक संबोधी ज्ञानप्राप्ती गया येथील निरंजना नदीकाठी असलेल्या पिंपळ व्रुक्षाखाली ३५व्या वर्षी वैशाखी पौर्णिमा इ.स.पू.५२८ बुधवार.

(४)तथागतांचे महापरिनिर्वाण मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शालवनात जोडशाल व्रुक्षाखाली ८० व्या वर्षी- इ.स.पु.४८३. शुक्रवार.

सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमाला जम्बुद्विपात काही विभूतींचा जन्म झाला।

(१)कपिलवस्तु नगरीच्या शेजारी रामग्राम नगरीत कोलीय वंशीय राजा सुप्पबुध्द अर्थात दंडपाणी आणि राणी पमिता यांची कन्या युवराज्ञी ‘यशोधरा’ चा जन्म.

(२)राजा शुध्दोधनाचा भाऊ अमितोदन याचा पुत्र व सिध्दार्थ गौतमाचा चुलत भाऊ आणि प्रिय शिष्य ‘आनंद’महास्थविराचा जन्म याच दिवशी.

(३)सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या दिवशीच राजा शुध्दोधनाचा अमात्य उदासेन याचा पुत्र व पुढे सिध्दार्थ गौतमाचा मित्र ‘कालुदायी’चा जन्म झाला.

(४)सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या दिवशीच सिध्दार्थ गौतमाचा सारथी ‘छन्न’ चा जन्म झाला.

(५)सिध्दार्थ गौतमाचा प्रिय घोडा ‘कन्थक’ चा जन्म याच दिवशी.

(६)अजानीय गजराजा चा जन्म याच दिवशी.

(७)सिध्दार्थ गौतमाच्या जन्माच्या दिवशीच गया येथे बोधीव्रुक्षाचा जन्म झाला.

(८) सात सुवर्ण कलषाची निर्मिती वैशाख पौर्णिमेला.

*वरील सर्व घटनांचा आजच्या वैशाखी पौर्णिमेचा अद्भुत मंगल संयोग आहे*.

*जगाला शांतिचा संदेश देणारे,करुणासागर, महाकारुणिक*,

*तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या *२५८५व्या* *जयंतीच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा*!