पहिला हप्ता दिड लख रुपये दिलेल्या लाचेच्या रक्कमे मध्ये १५ हजार रुपयांच्या ओरिजनल नोटा व १ लाख ३५ हजाराच्या मुलांच्या खेळण्याच्या डुप्लीकेट नोटा….!!
रवि माळवी
श्रीमती जया विनोद राऊत (४२ वर्षे) उप आयुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ तसेच वरिष्ठ लिपीक नितीन कडे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ व एक खाजगी व्यक्ती सावन प्रकाश चौधरी (३८ वर्षे) असे लाचेची रक्कम स्विकारणार्या आरोपींची नावे आहेत. ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर येथील एका ४५ वर्षीय तक्रारकत्र्या शिक्षकाने यवतमाळ येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकरीता प्रस्ताव सादर केला होता.
तेथील आरोपी अधिकारी उपायुक्त तथा सदस्य व वरिष्ठ लिपीकाने तक्रारदार शिक्षकाला २ लाख रुपये लाचेची मागणी केली व लाचेचा पहिला हप्ता दिड लाख रुपये त्यांनी त्यांच्या एका खाजगी व्यक्ती सावन चौधरी याचे जवळ देण्यास सांगीतले. सदर प्रकरणी तक्रारकत्र्या शिक्षकाने याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला दिली. ठरल्याप्रमाणे दिल्या जाणा:या लाचेच्या रक्कमेच्या पहिल्या हप्त्यामध्ये १५ हजार रुपयांच्या ओरिजनल नोटा व १ लाख ३५ हजाराच्या मुलांच्या खेळण्याच्या डुप्लीकेट नोटा असे एकुण दिड लाख रुपये देण्यात आले असता दिनांक ३ फेब्रुवारी रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने यवतमाळ येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात सापळा रचून आरोपींना रंगेहात अटक केली.
सदरची कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परीक्षेत्र अमरावती चे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अमरावती परीक्षेत्र अमरावतीचे अपर पोलीस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधिक्षक गजानन पडघन, अमरावती, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र जेधे, कारवाई पथक पोलीस निरीक्षक रविंद्र जेधे, पोलीस निरीक्षक रुपाली पोहनकर, मपोहवा ज्योती झाडे, पोलीस शिपाई पंकज बोरसे, शैलेश कडू, राजेश कोचे व सतिश किटकुले यांनी केली.