Home महत्वाची बातमी रेणुकामाता स्कुल अँड ज्युनियर कॉलेज व पी. जे. एस. इंगलिश मिडीयम स्कुलचा...

रेणुकामाता स्कुल अँड ज्युनियर कॉलेज व पी. जे. एस. इंगलिश मिडीयम स्कुलचा वार्षिक स्नेह संमेलना कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

632

अमीन शाह

चिखली , दि. ०४ :- दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० रेणुकामाता कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नायब तहसिलदार सातपुते मॅडम उपस्थिती होत्या तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघर्ष समितीचे प्रशांत ढोरे पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती तथा विद्यमान संचालक राजेंद्र जावळे,करियर गाईडचे संतोष कारले,केंद्र प्रमुख प्रकाश सपकाळ, वारकरी संप्रदायाचे सिंदखेड राजा ता अध्यक्ष राजेंद्र तळेकर,पं. स.सदस्य पती तथा दै, दिव्यामराठीचे चिखली तालुका प्रतिनिधी उद्धव थुट्टे पाटील,दै आम्ही चिखलीकर चे संपादक छोटू कांबळे,रेणुका माता कॉलेज च्या अध्यक्षा पुष्पाताई शेवत्रे,संस्थेचे सचिव अजय शेवत्रे, संस्थेचे उपाध्यक्ष अक्षय शेवत्रे,मुख्याध्यापिका कव्हाणे मॅडम आदी मान्यवर उपस्थिती होते,
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली,आपल्या प्रास्ताविक पर भाषणात शाळेचा वार्षिक अहवालाचे सादरीकरण तसेच संस्थेच्या भविष्यातील योजनांबाबत मुख्याध्यापिका श्रीमती कव्हाणे माहिती दिली,याप्रसंगी पालक प्रतिनधी यांचा देखील सत्कार करण्यात आला,विविध विभागीय राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले,
शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेशवंदना,देवीचा गोंधळ,झाडे लावा झाडे वाचवा,मुलींविषयी वडिलांच्या भावना,देशभक्तीपर गीते आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेशवर खाडे सरांनी व खेडेकर मॅडम यांनी केले तर आभार कुरंगळ सरांनी केले याप्रसंगी शिक्षक अरुण सर, विकास सर, महेश सर, सुरज सर, राम सर खर्डे सर, भंडारी सर वायाळ सर सुप्रीता मॅडम, टाले मॅडम, नागवाणी मॅडम कोकाटे मॅडम संकेत सर नेहा मॅडम,बोधेकर मॅडम, पालक प्रतिनिधी सुरेश झंगरे, संतोष सावळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.