Home वाशिम रविवार बाजारात दोन इसमांवर शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई ; ०२ पिस्टल, १३ जिवंत...

रविवार बाजारात दोन इसमांवर शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई ; ०२ पिस्टल, १३ जिवंत काडतुसे व ०१ लोखंडी धारदार कत्ता जप्त

48

 

फुलचंद भगत
वाशिम:-विनापरवाना घातक अग्निशस्त्र व धारदार शस्त्र अवैधपणे बाळगल्याप्रकरणी ०२ आरोपीविरुद्ध कलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दि.१०.०६.२०२३ रोजी गोपनीय सूत्रांकडून वाशिम येथील रविवार बाजारातील पार्किंगमध्ये ०२ इसम विनापरवाना कट्टा घेऊन फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार बाजार परिसरात संशयास्पद परिस्थितीत फिरत असलेल्या ०२ इसमांना ताब्यात घेतले व त्यांना पंचांसमक्ष त्यांचे नाव गाव विचारत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांनी त्यांचे नाव १) विनोद वसंता भोयर, वय २७ वर्षे, २) अनिल मारोती भोयर, वय २५ वर्षे, दोन्ही रा.वांगी, ता.जि.वाशिम यांच्या अंगझडतीत ०२ देशी बनावटीच्या पिस्टल, १३ जिवंत काडतूस, एक धारदार लोखंडी कत्ता, एक मोटारसायकल व एक मोबाईल असा एकूण १,२५,४००/- रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कलम ३, ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.अतुल मोहनकर, सपोनि.विजय जाधव,सपोनि.अजिनाथ मोरे, पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.संतोष कंकाळ, दीपक सोनवणे, पोना.प्रशांत राजगुरू, राजेश राठोड, अमोल इंगोले, ज्ञानदेव मात्रे, पोकॉ.विठ्ठल महाले, अविनाश वाढे, विठ्ठल सुर्वे यांनी पार पाडली. नागरिकांनी अश्याप्रकारे विनापरवाना शस्त्र बाळगीत समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू पाहणाऱ्या इसमांविरुद्ध न घाबरता समोर येऊन तक्रार देण्याचे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206