जळगांव :(शाह एजाज़ गुलाब)
“समाजसेवा हिच नारायण सेवा” या ईशवर तत्वाची शिकवणूक देणाऱ्या प.पू. सत्य साई बाबा आणि प.पू. दादासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने जळगांव न्यायालय सहा.अधीक्षक बी.जी.नाईक, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सोनार, मुख्य न्यायदंडधिकारी न्यायालयातील कार्यरत कर्मचारी भूषण जाधव, आणि सेवा निवृत्त प्रा.ए.एस. झोपे यांच्या आर्थिक योगदानातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फेसर्डी ता. जि. जळगाव येथे इयत्ता १ली ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पाटी पेन्सिल, कंपास कीट, वॉटर बॅग, लंच बॉक्स इत्यादी शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे रविवार ११ जून २०२३ रोजी समाज सेवेच्या स्वरूपात वाटप करण्यात आले.
कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांसोबत पालक, शिक्षक ठेलारी, सरपंच पाटील आणि गावकरी देखील उपस्थित होते.