Home जळगाव प्रवाशांना दिलासा , नादेड – श्रीगंगानगर एक्स्प्रेसला वाढीव कोच…

प्रवाशांना दिलासा , नादेड – श्रीगंगानगर एक्स्प्रेसला वाढीव कोच…

153

लियाकत शाह

भुसावळ , दि. ०४ :- रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अप-डाऊन नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसला एक वाढीव स्लीपर कोच डबा लावण्याचा निर्णय घेतला आहे.

६ फेब्रुवारीपासून नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेसला हा डबा लावला जाणार आहे तर डाऊन मार्गावरील गाडीला ८ फेब्रुवारीपासून डबा जोडला जाणार आहे. रेल्वे गाड्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी होत असल्याने प्रवाशांना बसण्यास जागा मिळत नाही. लांबल्या प्रवासातही प्रवाशांना उभे राहून जावे लागत आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अप-डाऊन मार्गावरील गाड्यांना एक-एक वाढीव स्लीपर कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना बसण्यास जागा मिळणार असून गैरसोय दूर होणार आहे. रेल्वे प्रशासनाने भुसावळ-नरखेड या मेमू गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे. पॅसेंजर बंद करून त्याजागी सुरू केलेल्या मेमूचे डबे कमी असल्याने प्रवाशांची जागेसाठी गैरसोय होत आहे.