Home विदर्भ विद्यार्थ्याने वर्गातच गळफास लावून केली आत्महत्या…!!

विद्यार्थ्याने वर्गातच गळफास लावून केली आत्महत्या…!!

127

अमीन शाह

चंद्रपूर , दि. ०४ :- चंद्रपूर जिल्ह्यात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रवींद्र बुरांडे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. रवींद्रने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
रवींद्र हा चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यात असलेल्या चौघान गावातील कृषक कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होता. १२ वीच्या कला शाखेचा तो विद्यार्थी होता. रवींद्रने सोमवारी पहाटेच्या सुमारास वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्ग उघडण्या आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. ज्याची माहिती शाळा प्रशासनाने पोलिसांना दिली.

आत्महत्या करण्यापूर्वी रवींद्रने फळ्यावर मजकूर लिहून ठेवला होता. “सॉरी प्रिन्सिपल सर मला जगण्याची इच्छा नाही. मी परफेक्ट नाही. मी प्रामणिक नाही. मी एकटा पडलो आहे. त्यामुळे आयुष्य संपवतो आहे.” या आशयाच्या ओळी त्याने फळ्यावर लिहून ठेवल्या होत्या. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी रवींद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली ते अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पुढील तपास पोलीस करत आहेत.