कोरपना – मनोज गोरे
चंद्रपुर , दि. ०४ :- नांदेड व अकोला जिल्ह्यात झालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी गडचांदुर येथे लोकस्वराज्य आंदोलन समिती वतीने शहरात मंगळवारी दुपारी 1 वाजता पेट्रोल पंप चौक येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे शहरातील वाहतुक खोळंबली होती. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतर संबध महाराष्ट्रात आंदोलने, मोर्चे होवूनही अद्याप कसल्याच प्रकारचा धाक प्रशासनाचा राहिलेला नाही. हे असे माणुसकीला काळीमा फासणार्या नराधमांना फाशी देण्यात यावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे.
पिडीत मुलीच्या कुटूंबास मदत करण्यात यावी, या मागण्यासाठी गडचांदुर येथे लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने दि.४ मंगळवारी दुपारी 1 वाजता पेट्रोल पंप चौक गडचांदुर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे शहरातील वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी तलाठी अंन्सारी याना मागण्याचे निवेदन देण्यात आले. कोरपणा चे ठाणेदार ए एम गुरुनुले ,गडचांदुर चे सहाय्यक पोलिस अधिकारी प्रमोद शिंदे व कर्मचार्यासह दंगल नियंत्रक पथक तैनात होता.