-
पाटणबोरी प्रतिनिधि
-
यवतमाळ – तालुक्यातील अवैद्य धंद्यासाठी सर्वत्र कुप्रसिध्द असलेल्या पाटणबोरी येथे गुटखा व तंबाखुजण्य पदार्थाच्या माध्यमातुन दैंनदिन लाखो रुपयांची उलाढाल होत असुन याकडे पोलीस तथा अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या वतीने दुर्लक्ष करण्यात येत आहे. तालुक्यातील पाटणबोरी येथे सद्या गुटखा व तंबाखुजण्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे.
याच गावातुन पांढरकवडा शहरासह झरी तालुक्यात, करंजी रोड, मोहदा रुझा, पहापळ, उमरी रोड आदि गावात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ पोहचविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे झरीजामणी व पारवा, घाटंजी येथे सुध्दा पाटणबोरी येथील काही व्यवसायीक गुटखा तंबाखुण्य व पोहचवित आहे. गुटखा व तंबाखुजण्य पदार्थाची वाहतुक व विक्री पाटणबोरी येथील व्यापारी आपल्या किराणा दुकाणातुन सर्रास खुलेआम पध्दतीने करीत असतांना त्यांच्यावर मात्र कार्यवाही होत नसल्याने दिसुन येत आहे व अवैध गुटका तंबाखु विक्री करणारे कीराणा व्यापारी यांच्या किराणा दुकाणात किराणा वस्तु मध्ये भेसऴ वस्तु विक्री करीत असल्याचे येथिल नागरीका मध्ये चर्चा रंगत आहे . गुटखा व तंबाखुजण्य पदार्थ विक्री करणाऱ्यांचे पोलीस तथा अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाटणबोरी येथिल व्यापारीचे आर्थीक संबंध जुळले असल्याने कोणतीच कारवाई होत नस्लयाचे दिसत आहे पाटणबोरी पासुन तेलंगाणातील अदीलाबाद येथुन गावाचे अंतर 19 की. मी असुन अदीलाबाद येथुन पाटणबोरी येथे दैनंदिन गुटका , तंबाखुजन्य पदार्थ र्विक्री करणाऱ्या किराणा व्यवसायीक तथा पान मटेरीयल विक्री करणाऱ्यांकडुन स्थानिक पोलीसांना महिण्याकाठी लाखो रुपयांची रसद पुरविण्यात येत असल्यानेच या तस्करावर कार्यवाही होत नसल्याचीही चांगलीच चर्चा पाटणबोरीत रंगत आहे.
अदिलाबाद येथुन पाटणबोरी येथे दैनदिन मोठ मोठ्या जड वाहनाव्दारे गुटखा व तंबाखुची खेप उतरविण्यात येत आहे. लाखो रुपये किमतीचा गुटखा व तंबाखुजण्य तंबाखुजन्य पदार्थ खुलेआम गावातील मेन रोडवरच उतरविण्यात येत असतांना सुध्दा याची साधी माहिती पोलीसांना मिळत नसावी म्हणजे नवलच म्हणावे लागेल. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करण्यासह जिल्हा पोलीस अधिक्षक तथा एलसिबी पथकाने याकडे लक्ष देण्याची मागणी गावातील सुज्ञ नागरिक करु लागले आहे .