अमीन शाह ,
प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी शिर्डीला सहपरिवार भेट देऊन श्रावणी तिसऱ्या सोमवारी श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. अभिनेत्री
शिल्पा शेट्टी व तिचा संपूर्ण परिवार हा साईभक्त आहे .शिल्पा शेट्टी ही अनेकदा शिर्डीला येऊन तिने साईबाबांचे दर्शन घेतले आहे. सोमवारी ती शिर्डीत आली . तिच्याबरोबर तिचा परिवार होता. त्यांनी श्री साई समाधी मंदिरात दुपारची मध्यान आरती केली. त्यानंतर दर्शन घेतले. साई दर्शननंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिच्या परिवाराचा साई संस्थांनच्या वतीने संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी त्यांना शाल व श्री साई मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी शिर्डीत आल्याचे समजताच चाहत्यांनी, साईभक्तांनी त्यांना पाहण्यासाठी मंदिर परिसरा बाहेर गर्दी केली होती.