घनसावंगी /लक्ष्मण बिलोरे
-आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिशी समाजाची शक्ती उभी आहे.सरकारने ३० दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय देवू असे आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणास स्थगिती दिली.त्यानंतर ४० दिवस किर्तनाची मालिका ठेवली. ‘ भक्ती आणि शक्ती जीथे एकत्र येते तिथे निश्चितच क्रांती घडल्याशिवाय राहत नाही.आरक्षणाच्या निमित्ताने मराठा मावळे लाखोंच्या संख्येने एकत्र येत आहेत. ‘ मावळे ‘ एकत्र आल्यावर काय घडतं याची साक्ष इतिहास देतं ‘असे प्रतिपादन हभप विष्णू महाराज आनंदे मासेगावकर यांनी आसनगाव, ता.परतुर येथे आयोजित किर्तनात केले.’ गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही सरकारकडे समाजाची हक्काची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी भगवान परमात्म्याने पाठवलेला दूत आहे.आरक्षणामुळे मराठा समाजातील मुलाबाळांच भवितव्य घडावं,कल्याण व्हावं यासाठी अनेक प्रकारे सरकारला समजावण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. जरांगे पाटील निःस्वार्थपणे समाजासाठी लढतो आहे.समाजासाठी लढणे सोपे नाही.तीथे त्यागाची पराकाष्ठा करावी लागते.समाजासाठी १७ दिवस उपोषण केलं.जीवनात त्याग महत्वाचा आहे. जो जगासाठी ,समाजाच्या हितासाठी लढतो,इतिहासात त्यांचीच नोंद होते.सरकारकडे हक्क मागण्याचा समाजाला अधिकार आहे.समाजाच्या भावना लक्षात घेवून सरकारने निर्णय घेतला पाहिजे.मराठा आरक्षण लढ्यात भक्ती आणि शक्ती एकत्र आलेली आहे. त्यामुळे निश्चितच क्रांती घडणार आहे.संसारात राहून जे जगाचा,समाजाचा विचार करतात तेच किर्ती रूपाने उरतात,म्हणून समाजाचे हित कशात आहे यासाठी जगलं पाहिजे.नदी,नाले समुद्रात मिळतात तेव्हाच तृप्त होतात.जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही.आरक्षण नसल्याचे मराठा तरूण सुशिक्षीत असतानाही बेरोजगार बनून जगत आहेत.आरक्षणाच्या निमित्ताने मराठा मावळे एकवटले आहेत. मावळे एकत्र आल्यावर काय घडतं हे इतिहास वाचल्यावरच समजतं’ असे मराठा हितरक्षक विष्णू महाराज आनंदे यांनी विविध दृष्टांत देवून उपस्थित समाजासमोर विचार व्यक्त केले.