Home जालना कॅनरा बँकेत कृषी अधिकाऱ्यांची मनमानी,पिककर्जासाठी शेतकऱ्यांची होत आहे धुळधानी

कॅनरा बँकेत कृषी अधिकाऱ्यांची मनमानी,पिककर्जासाठी शेतकऱ्यांची होत आहे धुळधानी

141

घनसावंगी /लक्ष्मण बिलोरे

-घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील कॅनरा बँकेत कृषी अधिकारी आणि शाखाधिकारी यांच्या संगनमताने सामान्य शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविण्यासाठी जाचक अटींमुळे तारेवरची कसरत करावी लागत असून दलालांमार्फत दिलेल्या पिककर्ज फाईल्स आर्थिक व्यवहाराने बिनबोभाट स्विकारल्या जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असल्याचे दिसून येत आहे. कॅनरा बँकेत ‘कृषी अधिकारी बोले अन् शाखाधिकारी डोले’ या नितीमुळे शेतकऱ्यांची गळचेफी होत आहे. अधिकृत माहितीनुसार कॅनरा बँकेत कृषी अधिकारी आणि शाखाधिकारी यांच्यात एकमत झाल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांची लाखों रूपयांची थकबाकी असलेल्या लोकांची कर्ज प्रकरणी मंजुर करण्याचा सपाटा सुरू आहे आणि सामान्य शेतकरी सरळ बँकेत गेला तर टोलवाटोलवी करून काढून दिल्या जाते.बँकेतील बोगस कर्जप्रकरणाची चौकशी करण्यात आली पाहिजे’ आणि सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.नसता कार्यवाही करू असा इशारा कर्जदार आणि जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष राजु पुजारी यांनी दिला आहे.राजू पुजारी यांनी म्हटले आहे कि,येथील कॅनरा बँकेच्या शाखेत राष्ट्रीयकृत बँकेच्या शेकडो थकबाकीदारांना ‘अर्थपूर्ण’व्यवहार करून लाखों रूपयांचे कर्ज दिल्या जात आहे. काही थकबाकीदारांवर कार्यवाहीस्तव न्यायालयीन नोटीस बजावलेली असतांना कॅनरा बँक कर्ज वितरीत करत आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात येणारी गावं डावलून कार्यक्षेत्राबाहेरील ग्राहकांना कर्ज देण्यात येत आहे.कृषी अधिकारी आणि शाखाधिकारी यांच्या मेहरबानीने अवांतर लोकांनाही कर्ज वाटप केले जात असल्याने गरजवंत शेतकरी पिककर्जापासून वंचित राहत आहेत.दुष्काळ परिस्थिती मध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. मार्च ते ऑक्टोंबर अखेरपर्यंत गेल्या साडेसहा महिन्यात मागेल त्या शेतकऱ्यांना कर्ज असे सरकारी धोरण राबविले जात असताना कॅनरा बँकेच्या लुटारु अधिकाऱ्यांमुळे गरजू समान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे.